By : Polticalface Team ,04-10-2024
                           
                लिंपणगाव (प्रतिनिधी नंदकुमार कुरूमकर )- तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेनंतर श्रीगोंदा तालुक्यात आई जगदंबा माता; आईतुळजाभवानी माता; दुर्गामाता; अंबिका माता; रेणुका माता इत्यादी दैवी शक्तींचा जागर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गावोगावी जे दैवी शक्तीची मंदिरे आहेत; ती मंदिरे आता आकर्षक विद्युत रोषणाईने मन हे लावून टाकताना दिसत आहेत. त्यामध्ये सायंकाळी आराधी मंडळींची मैफल; दैवी शक्ती वर आधारित गाण्यांचा सिलसिलाट त्यामुळे नऊ दिवस धार्मिक सांस्कृतिक गाण्यांद्वारे उत्तम प्रकारे प्रबोधन होताना दिसत आहे. घटस्थापना ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिसऱ्या शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे घटस्थापना गेल्या आठ दिवसापासून आई जगदंबा मातेच्या स्वागतासाठी घरांची स्वच्छता; अंगणातील सडा; रांगोळ्या याबरोबरच घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवीन संकल्प त्यामध्ये वाहन खरेदी; ट्रॅक्टर; मोटरसायकल खरेदी अशा अनेक वस्तू जीवनाला संजीवनी ठरणाऱ्या त्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी खरेदी केल्या चे दिसून आले. निश्चितच घटस्थापनेचा दिवस हा शुभ दिवस समजला जातो. त्यादिवशी आई जगदंबा माता अदृश्य शक्ती द्वारे प्रत्येकाच्या घराघरांमध्ये प्रवेश करते असे जुने जाणकार ज्योतिष्य सांगतात.          त्यामुळे भारतीय संस्कृतीत घटस्थापना हा अत्यंत पवित्र शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या नवरात्र उत्सवांमध्ये प्रत्येक जण आपल्या घरामध्ये पावित्र्याचे पालन करताना दिसत आहेत. त्यामध्ये श्रीगोंदा तालुका हा संत शेख महंमद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत पवित्र असा तालुका समजला जातो. या तालुक्यांमध्ये धार्मिक उत्सव अत्यंत गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. प्रामुख्याने तालुक्यातील साळवण देवी आणि श्रीगोंद्यातील रेणुका माता मंदिर वांगदरीचे अंबिका माता हे भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून या नवरात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम या मंदिरांमध्ये पार पडतात. अनेक भाविक भक्त या दैवी शक्तींना कौटुंबिक समस्या दूर होण्यासाठी साकडे घालतात. नवसाला पावणारे या शक्ती असल्याने निश्चितपणे या दैवी शक्तीवर भक्तांच्या अपार  श्रद्धा दिसून येत आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे दूर होतात. असे भक्तगण सांगतात. त्यामुळे घटस्थापना म्हटले की; अंबिका माता; रेणुका माता; दुर्गामाता; तुळजाभवानी माता इत्यादी मंदिरांमध्ये रात्रभर आराधी मंडळी यांच्या समवेत ग्रामस्थ महिला मोठा जागर करतात. त्यातून निश्चितपणे एक प्रकारे भक्तीमय वातावरण नऊ दिवस तयार होत असते. या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रत्येक धर्मांमध्ये सामाजिक सलोखा; बंधुत्व आणि एक आपुलकीचे नाते अधिक दृढ होताना दिसते. त्याचे देखील तंतोतंत पालन करण्यात येत आहे.      दरम्यान लिंपणगाव येथे तर तरुण कार्यकर्त्यांनी लिंपणगाव मुंढेकरवाडी रोड लगत असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या कलश रोहन करण्याचा संकल्प घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर घेतला. यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात भक्तगण आर्थिक हातभार लावून सहभागी होत आहेत. त्यामध्ये गावातील तरुण कार्यकर्ते; सप्ताह मंडळ यांच्याकडून जास्तीत जास्त वर्गणी गोळा करून या तुळजाभवानी मातेच्या आकर्षक अशा कलशरोहणाचा निर्णय घेतला आहे. गावातील धार्मिक कार्यक्रमात तरुण वर्ग अग्रेसर असतो. यापूर्वी गावातील दुर्लक्षित मंदिराचा देखील या तरुणांनी उत्तम प्रकारे लोकसभागातून जीर्णोद्धार केला तो अत्यंत प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घटस्थापने निमित्त संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात एक प्रकारे भक्तीने वातावरण तयार होत असल्याचे दिसून येत आहे.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष