मुलींना छेडछाड, एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह, बारामतीत अजितदादा ॲक्शन मोड मध्ये

By : Polticalface Team ,04-10-2024

मुलींना छेडछाड, एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह, बारामतीत अजितदादा ॲक्शन मोड मध्ये जनआधार न्युज भिमसेन जाधव बारामती : मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण, कायदे विषयक मार्गदर्शन; बारामतीत पंचशक्ती अभियानशहरात गेल्या काही दिवसांत घडलेल्या खळबळजनक घटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोड मध्ये आले आहेत. पवार यांनी गुरुवारी(दि ३) पहाटे सहा वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वपूर्ण निर्णय घेतले. महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थीनी, महिलांच्या प्रभावी सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पंचशक्ती अभियान सुरु केले आहे.    यामध्ये शक्ती बाॅक्स, शक्ती कक्ष, शक्ती नंबर, शक्ती नजर, शक्ती भेट या उपक्रमांचा समावेश आहे.शाळा महाविद्यालय,शासकीय कार्यालयांसह सर्वत्र सार्वजनिक ठीकाणी हे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.पवार यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. पवार म्हणाले, शहरात पंचशक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यात महिलांचा सन्मान, पालकांची सुरक्षा आणि युवकांचे प्रबोधन या अभियान केलं जाणार आहे.

 या अभियानात पंचशक्ती आहे. शक्ती बाॅक्स ही एक तक्रारपेटी शाळा महाविद्यालय, शासकीय कार्यालयांसह अनेक महिला तथा मुलींना अडचणींबाबत म्हणजे मुलांकडून होणारा पाठलाग, छेडछाड, निनावी काॅल सारखे काही प्रकार चालतात, याबाबत पीडित महिला किंवा मुलींना मनमोकळेपणाने त्यांना ही गोष्ट सांगता येत नाही. अशा पीडितांना आपलं म्हणणं किंवा आपली तक्रार या पेटीद्वारे मांडता येणार आहे. गुन्हेगारीच्या अनुषंगाने काही संशयास्पद वस्तू आढळल्यास, तसेच अवैध गांजा, गुटखा इत्यादींचा साठा सापडल्यास याबाबतची गोपनीय माहिती तक्रारपेटीत टाकल्यानंतर पोलिसांमार्फत सदरची पेटी उघडून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांचं नाव देखील अतिशय गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पवार म्हणाले.                 

त्याचबरोबर एक शक्तीनंबर देखील तयार केला आहे. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह असं स्लोगन त्याला दिलंय. तो नंबर ९२०९३९४९१७ या क्रमांकाची सेवा सातही दिवस २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नंबरवर फोन किंवा मेसेज करुन तक्रार केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण करणे, कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात येइल. याशिवाय शक्ती नजर उपक्रमाअंतर्गत सोशल मिडीयावर पोलीसांची नजर राहणार आहे. यामध्ये शस्त्र, बंदुक, धारदार हत्यारांचे फोटो ठेवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येइल. तसेच शक्ती भेट अंतर्गत शाळा महाविद्यालयांना भेटी देण्यात येत आहेत. शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, कंपन्या हॉस्पिटल, बस स्टँड ,कोचिंग क्लास, महिला वसतीगृह आदी सार्वजनिक  ठिकाणी भेटी देऊन कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची सुसंवाद साधून लैंगिक, शारीरिक मानसिक छळापासून संरक्षण करून याबाबत जागरूकता निर्माण करणे, या भेटीचा उद्देश असल्याचे पवार म्हणाले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.