ट्रॉफी बारामतीलाच आली पाहिजे! गुलीगत फेम सुरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळे मैदानात; केलं वोट करण्याचं आवाहन

By : Polticalface Team ,04-10-2024

ट्रॉफी बारामतीलाच आली पाहिजे! गुलीगत फेम सुरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळे मैदानात; केलं वोट करण्याचं आवाहन

जनआधार न्युज भिमसेन जाधव बारामती

बिग बॉस मराठी ५ चा हा शेवटचा आठवडा आहे. या आठवड्यात मिड वीक एव्हिक्शन होणार आहे. घरातील सहा सदस्यांपैकी एक सदस्य बाहेर जाणार आहे. त्यात सूरजला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा आहे. मात्र आता फक्त महाराष्ट्रातील जनताच नाही तर राजकारणी देखील बिग बॉसचे फॅन झाले आहेत. महाराष्ट्राचे राजकारणी बिग बॉस मराठीच्या स्पर्धकाला पाठिंबा देताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या लाडक्या सदस्याला पाठिंबा देत जनतेला त्याच्यासाठी व्होट करण्याचं आवाहन केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी चक्क सुरज चव्हाणसाठी एक पोस्ट शेअर करत बारामतीकरांना त्याला वोट करण्यासाठी आवाहन केलं आहे.

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सूरज चव्हाणने जिंकावा, अशी सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचीही इच्छा आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन सूरज चव्हाणचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी व्होट अपिल केलं आहे. या पोस्टमध्ये लिहिलंय, आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्यांची क्रेझ वाढली आहे. बिग बॉससारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये 274 लोकांमधून अंतिम 16 मध्ये त्याची निवड झाली, ही आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

त्यांनी पुढे लिहिलं, त्यामुळे आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून केवळ दोन मिनिटांचा वेळ काढून आपल्या लाडक्या सुरज चव्हाण यास वोट करून महाविजेता करण्यासाठी आपले योगदान देऊयात. त्यासाठी जिओ सिनेमा ऍप्लिकेशन इंस्टॉल करुन बिग बॉस मराठी या टॅबवर जाऊन व्होट नाऊ (Vote Now) वर गेल्यावर सूरजच्या फोटोवर टच करुन आपलं वोट सबमिट करा, ही विनंती.

 जय पवार यांचीही पोस्ट

तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. बिग बॉस मराठीचा अंतिम टप्पा आता जवळ आला आहे! आपल्या सर्वांच्या आवडत्या बारामतीकर सुरज चव्हाणला जिंकवण्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. त्याच्या कलेने आणि जिद्दीने त्याने आपल्या सर्वांच्या हृदयात खास जागा मिळवली आहे. चला, एकत्र येऊन सुरजला VOTE करूया आणि बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकुन आणुया! सुरजसाठी सगळं पवार कुटुंब एकत्र आलंय असं म्हणायला हरकत नाही.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष