By : Polticalface Team ,05-10-2024
जनआधार न्युज भिमसेन जाधव :
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अजितदादांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूर : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. 4) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही आठवड्यांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालाय. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल", असं मतंही शरद पवारांनी व्यक्त केलं.
हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, दत्तामामा भरणेंच्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अजितदादांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली इंदापूर : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. 4) शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही आठवड्यांपासून हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालाय. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे असे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील. राष्ट्रवादीची विचारधारा ते मांडत असतील ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल", असं मतंही शरद पवारांनी व्यक्त केलं.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या निर्णयावर त्यांचे विरोधक आणि अजित पवारांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हर्षवर्धन पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. कारण हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांनाच माहिती आहे. अद्यापपर्यंत महायुतीचे जागावाटप झालेले नाही. मला तिकीट मिळणार आहे का नाही? हे मला देखील माहित नाही.
त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी असा निर्णय का घेतला हे त्यांनाच विचारावा लागेल असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
*2019 मध्ये दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन* *पाटलांचा पराभव*
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी इंदापुरात महायुतीची उमेदवारी देखील मिळवली होती. मात्र, त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा जवळपास 2 हजार मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी काळातही दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्येच लढत होईल, असे बोलले जात आहे.
*हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश कधी ?*
इंदापूर विधानसभेची जागा विद्यमान आमदार असलेल्या पक्षाला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरा पर्याय आपण काढू असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मात्र, दुसरा पर्याय स्वीकारणे आमच्या कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. तसे केल्यास तो माझा व्यक्तीगत निर्णय ठरला असता. मात्र प्रश्न जनतेचा आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय. माझ प्रवेश कधी होईल? हे माझ्या हातात नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. पवार साहेबांनी आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत. येणाऱ्या काळात राजकिय वनवास राहणार नाही. नवीन विकासाचे पर्व सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आपला रोल फक्त पक्षात प्रवेश करणं आहे बाकीचा रोल त्यांचा आहे तारीख त्यांची असेल, असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
वाचक क्रमांक :