लिंपणगाव मध्ये महावितरण चा सावळा गोंधळ सिंगल फेजच्या नावाखा ठेकेदाराकडून नळ योजनेची पाईपलाईन उध्वस्त माजी सरपंच अरविंद कुरुमकर

By : Polticalface Team ,06-10-2024

लिंपणगाव मध्ये महावितरण चा सावळा गोंधळ सिंगल फेजच्या नावाखा ठेकेदाराकडून नळ योजनेची पाईपलाईन उध्वस्त     माजी सरपंच अरविंद कुरुमकर

लिंपणगाव( प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या नळ योजनेची पाईपलाईन महावितरणच्या ठेकेदाराकडून जागोजागी उध्वस्त केल्यामुळे लिंपणगावचा गेल्या दहा ते बारा दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अशी माहिती लिंपणगाव चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अरविंद कुरुमकर यांनी दिली. अधिक माहिती देताना श्री कुरुमकर यावेळी म्हणाले की; गेल्या पंचवीस दिवसापासून महावितरण कंपनीने ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता सिंगल फेजचे पोल परस्पर नळ योजनेच्या पाईपलाईन वर खोदून पाईपलाईनची मोडतोड केल्याने गावचा गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. असे सांगून श्री अरविंद कुरुमकर आणखी पुढे म्हणाले की महावितरण ने गाव परिसरातील विद्युत पुरवठा करणाऱ्या जुन्या जीर्णतारा तोडून गाव परिसरात केबल द्वारे विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. जुन्यात जीर्णतारा देखील संबंधित ठेकेदारांनी ताब्यात घेऊन परस्पर विल्हेवाट  लावल्याचे श्री कुरुमकर यांनी म्हटले आहे. त्याचीही चौकशी झाली पाहिजे ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता संबंधित ठेकेदार यांनी गावच्या नळ योजनेच्या पाईपलाईन वर अनेक ठिकाणी विद्युत पोल बसवून गावच्या पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा केल्याने ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील कुरुमकर यांनी म्हटले आहे. 

      मिळालेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीने श्रीगोंदा तालुक्यात ग्रामीण भागांमध्ये वीज चोरीला आळा बसण्यासाठी जुन्या जीर्ण तारा काढून नवीन सिमेंट पोल बसून केबल द्वारे विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. परंतु महावितरण कंपनीने ग्रामपंचायतला विचारणा न करता परस्पर विद्युत पोल बसवून ग्रामपंचायतीच्या नळ योजना पाईपलाईनची मोठ्या प्रमाणावर मोड तोड केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव येथे गेल्या पंधरा दिवसापासून सिमेंट पोल बसवताना नळ योजनेच्या पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात मोडतोड करून नुकसान केले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी देखील या प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची आवश्यकता होती. परंतु कुठल्याही प्रकारची विचारणा संबंधित ठेकेदाराला केलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात महावितरणच्या ठेकेदाराने नळ योजनेची पाईपलाईन जागोजागी तोडल्याने गेल्या दहा-बारा दिवसापासून गावचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  ऐन सणासुदीच्या कालावधीत ग्रामस्थ व महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येऊन ठेपली आहे. या प्रकरणाला गावचे ग्रामविकास अधिकारी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. मुळात ग्रामसेवकच या प्रकरणाला जबाबदार असल्याचे अरविंद कुरुमकर यांनी आरोप केला आहे. मोठ्या लोकसंख्येचे गाव असताना ग्रामसेवक केव्हा? येतात आणि केव्हा जातात? हे देखील ग्रामस्थ सदस्यांना देखील माहित नसते. या प्रश्न गटविकास अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता असल्याचे श्री कुरुमकर यांचे म्हणणे आहे गावच्या नळ योजनेचा खेळ खंडोबा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचे अरविंद कुरुमकर यांनी म्हटले आहे या प्रश्न श्रीगोंदा च्या गटविकास अधिकाऱ्यां कडे तक्रार दाखल करून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छडावे लागेल; असा इशारा देखील माजी सरपंच अरविंद कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.


  

गावच्या जलजीवन चे तीन तेरा

    यावेळी अधिक माहिती देताना अरविंद कुरुमकर यांनी म्हटले आहे की; लिंपणगाव ग्रामपंचायतला जलजीवन योजनेसाठी साडेचार कोटी रुपये उपलब्ध झाले. परंतु लिंपणगावात मात्र या योजनेचे कामच झालेच नाही; मग हे साडेचार कोटी रुपये नेमके कुठे? खर्चे घातले? याचाही हिशोब ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा बोलवून ग्रामसभेत माहिती सांगावी. या प्रश्न आम्ही गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना जाब विचारणार असल्याचे अरविंद कुरुमकर यांनी म्हटले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष