करमाळा तहसील कार्यालय नवीन जागी स्थलांतर करण्याच्या विरोधात पाटील गट माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या करणार तहसील कचेरीच्या प्रांगणात धरणे आंदोलन

By : Polticalface Team ,08-10-2024

करमाळा तहसील कार्यालय नवीन जागी स्थलांतर करण्याच्या विरोधात पाटील गट माजी आमदार  नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या करणार तहसील कचेरीच्या प्रांगणात धरणे आंदोलन करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा तहसील व प्रशासकीय कार्यालय नवीन जागेत स्थलांतर विरोधात माजी आमदार नारायण (आबा) पाटील उद्या धरणे आंदोलन करणार असून यासाठी निवेदनाची प्रत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि करमाळा येथील सध्याचे तहसील कार्यालय करमाळा शहरापासून दीड किलोमीटर दूर स्थलांतरित करून नवीन जागेत बांधण्याचा घाट विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी बांधला आहे. या कामाचे टेंडर निघण्या अगोदरच घाई गडबडीत या कामाचे भूमिपुजन करण्यात आले आहे. या कामाची टेंडर नोटिफिकेशन आता उशिरा काढण्यात आली असून 12 ऑक्टोबर ही टेंडर भरण्याची शेवटची मुदत आहे. यामुळे नागरिकांची मागणी नसतानाही हा निर्णय घेतला जातं आहे. वास्तविक पाहता करमाळा तहसील कार्यालयाची सध्याची इमारत ही अतिशय भक्कम आणि वास्तुशास्त्राचा एक उत्तम दाखला म्हणून ओळखली जाते. या तहसील कचेरीच्या अगदी हाकेच्या अंतरावर पंचायत समिती, जमीन खरेदी विक्री, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख व नोंदणी कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन, न्यायालय आदी कार्यालये असून एकदा कचेरी आवारात आले कि नागरिक आपल्या अन्य कामांचा पाठपुरावा अगदी सहजपणे करू शकत आहे. शिवाय करमाळा शहराची मुख्य बाजारपेठ, बसस्थानक व बाजार समिती मध्ये जाणे त्याला शक्य होत आहे. परंतु आता विद्यमान आमदार शिंदे यांनी जाणीवपूर्वक तहसील कार्यालय नवीन जागेत घेऊन जाण्यासाठी आपली ताकद पणाला लावली असून कसल्याही परिस्थितीत आपण करमाळा शहरातील हे लोकांच्या सोयीचे व गजबजाटीचे ठिकाण शहरापासून दूर नेणार असा ठाम निर्णय घेतला आहे. या निर्णयला आवाहन देण्यासाठी तालुक्यातील मोठ्या राजकीय गटापैकी पाटील गटाने उघडपणे विरोध करावयाचे ठरवले असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृवाखाली उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजल्या पासून कचेरीच्या आवारात समोर पोलीस मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट ) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी, विविध गावातील स्थानिक स्वराज संस्था अर्थात ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनास करमाळा शहरातील व्यापारी तसेच छोटे व्यावसायिक यांचाही पाठिंबा असल्याचे समजते. यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांच्या उद्याच्या आंदोलनाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवेदनाच्या प्रति राज्याचे प्रधान सचिव, बांधकाम मंत्रालय सचिव, महसूल विभाग सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांत यांनाही पाठवन्यात आल्या आहेत. तसेच उद्याच्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.