मढेवडगाव मध्ये राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते 1 कोटी 20 लक्ष विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

By : Polticalface Team ,09-10-2024

मढेवडगाव मध्ये राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते 1 कोटी 20 लक्ष विकास कामाचे भूमिपूजन  संपन्न

लिंपणगाव ( प्रतिनिधी )- तालुक्यातील मढेवडगाव येथे एक वर्षांपूर्वी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होऊन नागवडे गटाचे संपूर्ण सत्ता आली परंतु मधल्या सहा महिन्यापासून आचारसंहितेच्या अडचणीमुळे विकास कामांना अडचण येत होती  परंतु लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांनी विविध शासनाचा निधी उपलब्ध करून धमाक्यामध्ये  विकास कामांची सुरुवात केली.
      त्यामध्ये दशक्रिया विधी परिसराचे सुशोभीकरण, गावातील  बाजारतळ ते लक्ष्मी माता मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक बसवणे, दलित वस्ती मध्ये लाईट व्यवस्था, त्याचबरोबर अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत  असलेला भैरवनाथ यात्रा उत्सवाचा दंडवत मार्ग वाबळेवाडा रस्ता हा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे यांच्या सहकार्यातून आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या निधीमधून मंजूर झाला. मराठी शाळा ते स्मशानभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण सुशोभीकरण, गोरे मळा/ उंडे मळा प्राथमिक शाळा सोलर बसवणे. 
  त्याचबरोबर कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे व शिंदे परिवार यांनी 1लाख रु. स्वतः खर्च करून स्व. चंद्रकांत कृष्णाबाई आनंदराव शिंदे यांच्या स्मरणार्थ दशक्रिया विधीच्या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांना बसण्यासाठी  बैठक व्यवस्था केली. त्याचे अनावरण व इतर कामांचे भूमिपूजन नागवडे सहकारी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते, व गटविकास अधिकारी सौ.राणीताई फराटे  विस्तार अधिकारी सौ.सारिका हराळ मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
          कार्यक्रम प्रसंगी  राजेंद्र नागवडे यांनी बोलताना सांगितले ग्रामपंचायत ही सर्व सामान्य जनतेच्या विकासाचे केंद्र असून विकास करत असताना कुठलाही भेदभाव न करता सर्व सामान्य जनतेला केंद्र बिंदू मानून कामे करा  त्याचबरोबर सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी कामे होत असताना त्यावर लक्ष ठेवून कामे दर्जेदार पद्धतीने होतील यावर लक्ष द्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सौ. अनुराधा नागवडे यांना आमदार करा आम्ही तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.  
   नागवडे कारखान्याचे संचालक  सुभाष काका शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, , मा. चेअरमन बापूसाहेब वाबळे, सौ नंदिनी वाबळे, हनुमंत झिटे, संतोष गुंड,  यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक राहुल साळवे व आभार नवनाथ उंडे यांनी मानले कार्यक्रमास विठ्ठल बापू जंगले, अविनाश वाबळे, उदयसिंह वाबळे, जयसिंग मांडे ,चेअरमन प्रकाश  उंडे पंडितराव वाबळे, बाळासो मांडे, वसंतराव उंडे, दत्तात्रय उंडे,मानसिंग मांडे, भीमराव फरकांडे, प्रवीण शिर्के, रावसाहेब जाधव, प्रा. एस एन उंडे, प्रा पवार सर, निळकंठ उंडे,भानुदास वाबळे, शिवाजीराव शिंदे, दत्ताशेठ झुंजुरुक, शंकर आण्णा मांडे,वसंत साळवे, शरद शिंदे, राजेंद्र मोहिते, राजू ससाने, डॉ.अरविंद उंडे,अशोक शिंदे, सचिन उंडे , दिलीप शेळके,गोरख मांडे, मार्शल वाबळे, अमोल गाढवे, ग्रा. सदस्य राजकुमार उंडे, लालचंद गोरे, योगेश शिंदे, बाळासाहेब कुरुमकर, दीपक वाबळे, बबनराव गोरे, संभाजी वाबळे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते  


विकास कामे करत असताना कुठलाही भेदभाव न करता पारदर्शी व दर्जेदार कामे करून गावामध्ये सर्व  ज्येष्ठांचे व सर्व सहकाऱ्यांचे  मार्गदर्शन घेऊन सर्वांना सोबत घेऊन निश्चितच गावाला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचा प्रयत्न करील. 
          सरपंच प्रमोद शिंदे


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.