मराठा समाजाच्या दसरा मेळाव्याला स्वाभिमानी मराठा महासंघाचे कार्यकर्ते जाणार : मा भानुदास वाबळे पाटील आणि मा रविभाऊ शिरसाठ
By : Polticalface Team ,09-10-2024
लिंपणगाव प्रतिनिधी :
दसऱ्यानिमित्त नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा भव्य दसरा मेळावा होणार आहे या दसरा मेळाव्याला स्वाभिमानी मराठा महासंघाचे हजारो कार्यकर्ते जाणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी मराठा महासंघाचे राज्य निरीक्षक व अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष भानुदास वाबळे पाटील आणि मा रविभाऊ शिरसाठ स्वाभिमानी मराठा महासंघा चे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष यांनी दिली आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलने झाली कै आण्णासाहेब पाटील यांनी सुध्दा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले अनेक मराठा बांधवांनी मराठा समाजाच्या प्रश्न सुटत नाहीत आरक्षण मिळत नाही म्हणून आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सह अनेक मराठा संघटना मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, स्वाभिमानी मराठा महासंघ दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्षा शिवशंभू प्रिया जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारों कार्यकर्ते नारायण गड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला जाणार आहे
मराठा समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरू मनोज जरांगे पाटील यांचा त्याग समाज कधीच विसरणार नाही कोपर्डी घटनेपासून एकत्र आलेल्या मराठा समाजाला दिशा देण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे आता आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे आवाहन स्वाभिमानी मराठा महासंघाचे राज्य निरीक्षक व अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष भानुदास वाबळे पाटील आणि मा रविभाऊ शिरसाठ जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी मराठा महासंघ सोशल मीडिया प्रमुख अहिल्यानगर यांनी केले आहे
वाचक क्रमांक :