By : Polticalface Team ,10-10-2024
                           
              लिंपणगाव (प्रतिनिधी) सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने बी.ओ.टी. तत्त्वावर (बांधा वापरा व हस्तांतरित करा) प्रेसमड व स्पेंट वॉश पासून सी.बी.जी. गॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून भविष्य काळा सदरचा प्रकल्प अत्यंत लाभदायक ठरणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व मे. राज प्रोसेस इक्विपमेंट अँड सिस्टीम प्रा.ली. पुणे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सदरचा प्रकल्प बी. ओ. टी. तत्त्वावर उभारण्यात येणार असून सोमवार ता. ७ रोजी सदर प्रकल्पाचे भूमिपूजन कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले. यावेळी नागवडे बोलताना म्हणाले की, कारखान्यामध्ये प्रतिवर्षीजी प्रेसमड व स्पेंटवाश तयार होतो त्यापासून सी.बी.जी गॅस तयार करण्यात येणार आहे. राज प्रोसेस ही कंपनी पूर्णतः स्वखर्चाने सदरचा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी कारखान्यात निर्माण होणारे प्रेसमड व स्पेंटवॉशचा पुरवठा कारखाना त्यांना करणार आहे . बायोगॅस निर्मिती हा शाश्वत व पर्यावरण पूरक ऊर्जा स्रोत आहे त्यामुळे पर्यावरण व अर्थव्यवस्था व समाज या तीनही घटकांवर सकारात्मक परिणाम होणार असल्यामुळे राज्य व केंद्र शासनाने या प्रकल्पास प्रोत्साहन देण्याचे धोरण घेतलेले आहे. हा प्रकल्प उभा करण्याकरिता कारखाना कंपनीस फक्त जागा उपलब्ध करून देणार असून सदर जागेचे भाडे प्रति वर्ष प्रति एकर एक लाख रुपये याप्रमाणे कारखान्यास मिळणार आहे. सदरचा करार हा पंधरा वर्षाकरिता करण्यात येणार आहे. पंधरा वर्षानंतर सदरचा प्रकल्प आहे त्या स्थितीत कारखान्याकडे हस्तांतरित करण्यात येणार असून कारखान्याच्या मालकीचा होणार आहे. सदर प्रकल्पाकरिता कारखाना 700 रुपये प्र.मे.टन या दराने कंपनीस प्रेसमड विकणार आहे. स्पेंट वॉश पासून तयार होणाऱ्या सीबीसी गॅसचे प्रति किलो 20 रुपये प्रमाणे उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे. त्यामुळे कारखान्यास प्रेसमड व स्पेंट वॉशची विल्हेवाट लावण्याच्या खर्चात बचत होणारा असून उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होणार आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार असल्याने उद्याच्या स्पर्धेच्या काळात शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देणे कारखान्यास शक्य होणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
संचालक लक्ष्मणराव रायकर व मारुती मामा पाचपुते यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व सर्व संचालक मंडळ सदस्य, राज प्रोसेस कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिलराज पिसे, मार्केटिंग व्हाईस चेअरमन विन पनीकर, व्हाईस प्रोजेक्ट प्रेसिडेंट रईस मुल्ला, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, चीफ इंजिनियर डी.एम. तावरे, प्रोडक्शन मॅनेजर एन.एम.कळमकर , चीफ अकाउंटंट सतिश जांभळे यांच्यासह इतर अधिकारी व कामगार उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष