भाजपाच्या युवा नेत्या मा. रश्मीदिदी बागल यांचे हस्ते मौजे पांगरे येथे जलजीवनचे लोकार्पण व विविध कामांचे भूमिपूजन संपन्न

By : Polticalface Team ,10-10-2024

भाजपाच्या युवा नेत्या मा. रश्मीदिदी बागल यांचे हस्ते मौजे पांगरे येथे जलजीवनचे लोकार्पण व विविध कामांचे भूमिपूजन संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60  मौजे पांगरे येथील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, हरघर नल ही योजना पूर्ण झालेली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा मा. रश्मीदीदी दिगंबररावजी बागल उपाध्यक्षा, भाजपा प्रदेश महिला आघाडी, संचालिका, महाराष्ट्र राज्य साखर संघ यांच्या शुभहस्ते, मा. विलासरावजी घुमरे सर, सचिव, विद्याविकास मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याचबरोबर मा. दिग्विजय दिगांबररावजी बागल, सदस्य, जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांचे निधी मधुन विविध योजना अंतर्गत, 3054 मधून दोन रस्त्यांसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये निधी, दलित वस्ती रस्त्यासाठी तीन लाख रुपयाचा निधी, त्याचबरोबर जन सुविधा मधून ग्रामपंचायत कार्यालय शुशोभिकरण करण्यासाठी चार लाख सत्तर हजार निधी दिलेला आहे. त्या कामाचे भूमिपूजन प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रस्ताविक ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी केले. त्याचबरोबर कल्याण सरडे महाराज, मा. घुमरे सर मा. रश्मीदीदी बागल यांची भाषणे झाली. महिला सक्षमीकरणासाठी व तालुक्याचे विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे बागल यांनी सांगितले. आभार सरपंच प्रा. डॉ. विजया दत्तात्रय सोनवणे यांनी मानले यावेळी जल जीवन योजनेसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाना कुलकर्णी व परिवाराचा, संकेत भैरवनाथ पारेकर यांची लातूर येथे अग्निशामक दलामध्ये निवड झाल्याबद्दल व विशाल दत्तात्रय टेकाळे यांची राज्य उत्पादन शुल्क पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक श्री मोतीरामआबा पिसाळ हे होते. या कार्यक्रमास आदिनाथ सह. साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब लोकरे, प्रकाश पाटील, पांडुरंग जाधव, ॲड. दत्तात्रय सोनवणे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीशबापू निळ, सचिन पिसाळ, युवराज रोकडे, गणेश तळेकर, कल्याण सरडे सर, विष्णू माने, माजी संचालक बापूराव कदम, बाजार समितीचे माजी संचालक रंगनाथ शिंदे, सुभाष पवार, वांगी वि. का. वि. सोसायटीचे माजी चेअरमन डॉ. विजय रोकडे, रवीकाका जाधव, ग्रा. सदस्य गणेश वडणे, भैरवनाथ हराळे, मयुरा पिसाळ, माजी सरपंच पुष्पा पाडसे, अरुण पिसाळ, तुळशीदास वडणे, हरिदास टेकाळे, परमेश्वर पाडसे, भैरवनाथ पिसाळ, पोपट सातपुते, सहदेव दोंड, राजेंद्र ठोंबरे, महादेव तोबरे, लक्ष्मण दोंड, युवराज तोबरे, संतोष आरकीले, जोतिराम गाडे, सौदागर दोंड आदी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद

नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान

खत आणि त्यावरील जबरदस्तीने दिले जाणारे खत; याबाबत शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात..!

दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.

कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक दोन्ही रूमच्या कुलपांना सिल केल्या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.

कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा

परिक्रमा तंत्रनिकेतनच्या कबड्डी संघाचे घवघवीत यश

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे मढेवडगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने माजी सेवा निवृत्त पोलीस दिलीप निवृत्ती दोरगे यांचा जागीच मृत्यू.

सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा

५१ हजार रूपयांच्या देणगीतून साकारतेय सभामंच व ध्वजस्तंभाचे काम - शिंदे वहिनींच्या दातृत्वाला सलाम! !

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे

श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि जीवन सुंदर बनवा - सुरेंद्र गुजराती

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन