By : Polticalface Team ,10-10-2024
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील गुळसडी ते देवळाली मार्गावर बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने शेतकरी वर्गामध्ये एकच गोंधळ व घबराटीचे वातावरण तयार झाले आहे
आज संध्याकाळी सात वाजता सदरच्या मार्गावर एका जेसीबी चालकाला सदरचा बिबट्या, सदृश्य प्राणी दिसला असून यामुळे मात्र शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळेस उसाला पाणी देणे याशिवाय शेताच्या कामांमध्ये व्यस्त असतात अशातच आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जेसीबी चालकाला सदर मार्गावर बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सदरचा बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराहाटीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी वर्गाने घाबरून न जाता वेळीच दक्ष रहावे असे आवाहन गुळसडी गावचे युवा कार्यकर्ते मानसिंग खंडागळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे
वाचक क्रमांक :