By : Polticalface Team ,13-10-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लिंपणगाव येथे विजयादशमीनिमित्त दसरा सण पारंपारिक पद्धतीने उत्साही वातावरण साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातून मुख्य चौकातून सर्व धर्मीय बांधव वाजत गाजत सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात शिमोलगण म्हणजे शुद्ध मराठी भाषेमध्ये आपटा या झाडांच्या फांद्याची कोपी तयार करतात. तेथे पूजन करून सोनेरी झाडाच्या आपट्याचे फांद्यांचे प्रत्येक जण एकमेकांना आलिंगन घालतात. विजयादशमी हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण समजला जातो. या दिवशी गावामध्ये भावनिक व धार्मिक वातावरण निर्माण होते. यावेळी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण सोने; चारचाकी; दुचाकीगाडी खरेदी करतात. तर अनेक जण नवीन घरांचा पाया खोदतात त्यामुळे विजयादशमी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व निर्माण होत असते. दरम्यान लिंपणगाव येथे पूर्वापार पारंपारिक पद्धतीने सिमुलंगण हे कुरुमकर पाटील घराण्याला मान दिला जातो. तो मान लिंपणगाव सोसायटीचे माजी चेअरमन दादा कुरुमकर यांना दिला गेला. यावेळी सर्व धर्मीय कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निश्चितच विजयादशमीनिमित्त लिंपणगाव मध्ये सर्व धर्मीय कार्यकर्ते ग्रामस्थ हे वाजत गाजत दसऱ्याच्या सण आनंदाने साजरा करतात. त्यातून प्रत्येकांमध्ये सर्व धर्म समभाव बंधुत्व याबरोबरच गावामध्ये शांतता प्रस्थापित निर्माण होते. विशेष म्हणजे गावामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम साजरा करताना कुठलाही पक्ष भेद न करता राजकारण विरहित धार्मिक सण साजरा केले जातात. त्यातून नवीन पिढीतील तरुणांना देखील एक प्रकारे प्रेरणा मिळते. सिमुलंगण झाल्यानंतर सर्वजण गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर महाराजांना आपट्याच्या झाडाची पाने वाहतात. यावेळी प्रत्येक वर्ष हे निरोगी आरोग्य याबरोबरच सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा; प्रत्येक वर्षी भरपूर पाऊस पडावा त्यातून सर्वांना धनधान्य प्राप्त व्हावे अशा प्रकारे सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतात.
या दसरा कार्यक्रमास माजी सरपंच अरविंद कुरुमकर; सुदामराव कुरुमकर; सुभाषराव कुरुमकर; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; प्रवीण कुरुमकर; जालिंदर कुरुमकर; बबनराव भगत; चंद्रकांत भोईटे सर्व ठोमस्कार बंधू कुरुमकर परिवारातील सर्व सदस्य; भगत परिवारातील सर्व सदस्य; भोंडवे परिवारातील रवींद्र भोंडवे; संतोष भोंडवे; रेवगे परिवारातील सर्व सदस्य; वाघमारे परिवारातील सर्व सदस्य; खळदकर परिवारातील सर्व सदस्य; हांडे परिवारातील सर्व सदस्य; वाल्हेकर परिवारातील सर्व सदस्य; बडवे परिवारातील सर्व सदस्य तसेच ओहोळ परिवारातील बाबासाहेब ओहळ असे अनेक कार्यकर्ते व युवक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने या दसरा कार्यक्रमास उपस्थित होता.
वाचक क्रमांक :