By : Polticalface Team ,14-10-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या नुकत्याच झालेल्या आंतर विभागीय क्रॉसकंट्री 10 किलोमीटर रनिंग स्पर्धेत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची सुरेखा मातने हिची बँगलोर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत निवड झाली. सुरेखा मातने हिने अत्यंत खडतर परिस्थितीतून व स्वकष्टाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. ऊसतोड कामगाराच्या मुलीचा हा संघर्ष प्रत्येक खेळाडू मुलींसाठी प्रेरणादायी आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुल जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संजय अहिवळे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुरेखा मातनेला शा. शि .संचालिका कल्पना बागुल आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :