रमजान हवालदार सर यांना कृतीशील विज्ञान शिक्षक पुरस्कार
By : Polticalface Team ,14-10-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी ) शिक्षक नेते व नागवडे साखर कारखान्याचे संचालक तथा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव श्री रमजान हवालदार सर यांना जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, अहमदनगर यांच्या वतीने कृतिशील विज्ञान शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल श्री रमजान हवालदार सर यांचे ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र दादा नागवडे. ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे. नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस . संस्थेचे निरीक्षक बी.
के. लगड सर. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक श्री सचिनराव लगड सर यांनी अभिनंदन केले.शिक्षक म्हणून त्यांनी विज्ञान शिक्षणात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! व्यक्त करण्यात आल्या. यावेळी शिक्षणधिकारी अशोक कडूस मा. संचालक शिक्षण दिनकर टेमकर दत्तात्रय आरोटे बद्रीनाथ शिंदे मधुकर नागवडे देविदास खेडकर रवींद्र भोंडवे व रवींद्र बर्वे जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते
वाचक क्रमांक :