By : Polticalface Team ,14-10-2024
जन आधार वृत्त
श्रीगोंदा दि.12 : श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध वेश्याव्यवसाय राजरोस पणे सुरू आहे. या अवैध वेश्याव्यवसायामुळे तालुक्यासह तालुक्याच्या बाहेरील अल्पवयीन मुले तसेच कॉलेज तरुण हे वेश्याकडे आकर्षित होत आहे. युवा पिढी व्यसनाधीन होण्यासोबतच वेश्यागमन करत असल्याने उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसामुळे तालुका वेश्याव्यवसायाचे केंद्र बनले असल्याने या कडे श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या अवैध वेश्याव्यवसायाकडे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसत आहे.
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगर सोलापूर, नगर दौंड तसेच काष्टी जामखेड हे महामार्ग जात आहेत. तर बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नगर पुणे आणि नगर दौंड हे दोन महामार्ग जात असून या महामार्गावर असलेल्या हॉटेल तसेच लोजींगवर पोलिसांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणत अवैध वेश्याव्यवसाय रात्रंदिवस राजरोस सुरू आहेत. वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पश्चिम बंगाल, नेपाळ, मध्यप्रदेश इंदोर, केरळ, यासह काही स्थानिक महिलांसह अल्पवयीन मुलींचा वापर करण्यात येतो.
वेश्याव्यवसायावर कारवाई करण्याचे काम आमचे नाही..पो. नि. भंडारे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम स्थानिक पोलिसांचे असून वेश्याव्यवसायावर कारवाई करण्याचे काम आमचे नाही. वेश्याव्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र विभाग आहे. तिकडे तक्रार झाल्यावर ते कारवाई करतील. - संतोष भंडारे पोलिस निरीक्षक बेलवंडी
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काष्टी, श्रीगोंदा शहर, बनपिंपरी, घोगरगाव तर बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गव्हाणवाडी, बेलवंडी फाटा, गव्हाणवाडी निघोज रस्त्यावर, चिखलीघाट या परिसरातील हॉटेल, लोजींग, ढाबा तर काही ठिकाणच्या इमारतीमध्ये राजरोस वेश्याव्यवसाय रात्रंदिवस सुरू आहे.
श्रीगोंदा तसेच बेलवंडी पोलिस ठाण्याचा परिसर पुणे, बीड जिल्ह्याच्या लगत असल्याने येथे अवैध वेश्याव्यवसायाची रेलचेल आहे. या वेश्याव्यवसायामुळे तालुक्यासह तालुक्याच्या बाहेरील अल्पवयीन मुले तसेच कॉलेज तरुण हे वेश्याकडे आकर्षित होत आहे. युवा पिढी व्यसनाधीन होण्यासोबतच वेश्यागमन करत असल्याने एड्स सारख्या महाभयंकर रोगाला बळी पडून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध वेश्याव्यवसायासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि अवैध वेश्याव्यवसायावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या बाबत पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
अधिक चौकशी करून कारवाईच्या सूचना देतो..
कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर देखील कारवाई करण्याचे काम स्थानिक पोलिसांचे आहे. अवैध वेश्याव्यवसायाबाबत अधिक चौकशी करून कारवाईच्या सूचना देतो... - प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक.