By : Polticalface Team ,15-10-2024
त्या माध्यमातून देशांमध्ये नवीन विचाराच्या क्रांतीला सुरुवात झाली होती, आज मात्र वास्तवामध्ये या महापुरुषांच्या नावाने लाखो संघटना आहेत. परंतु प्रतिगामी मनुवादी प्रवृत्ती मात्र प्रबळ झाली आहे, हे थांबवायचं असेल तर राष्ट्रीय स्तरावर मूलनिवासी बहुजनांना एकत्रित येऊन एक व्यापक लढा उभा करावा लागेल. त्यासाठी त्यागी आणि समर्पित भावनेने काम करणाऱ्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी राष्ट्रीय पातळीवर उभा करण्याचा मानस ‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘चे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे यांनी व्यक्त केला. श्रीगोंदा येथे एक दिवशीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते, यावेळी बोलताना त्यांनी देशातील मूलनिवासी बहुजनांचा इतिहास व प्रतिगामी मनुवादी प्रवृत्ती कडून होणारे नुकसान यावर सविस्तर मांडणी केली.
युनिटी ऑफ मूलनिवासी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीगोंदा येथील बौद्ध व जैन विचारांचे अभ्यासक, तत्त्वचिंतक प्रा. अजित खरसडे यांची निवड करण्यात आली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पारनेरचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :