आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

By : Polticalface Team ,15-10-2024

आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार नाही भाजपाची उमेदवारी मलाच मिळेल, भाजपा नेत्या सुवर्णाताई पाचपुते यांचे पत्रकार परिषदेत सुतवाच्य

     लिंपणगाव(प्रतिनिधी):- एक वेळ सूर्य पूर्व दिशे ऐवजी पश्चिमेकडून उगवेल पण आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे भाजप नेत्या सौ.सुवर्णा ताई पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुवर्णाताई पाचपुते पुढे म्हणाल्या की भाजप मधून २० वर्षापूर्वी राजकीय कारकीर्द सुरू करून गेली २० वर्षे भाजप ला प्रतिकूल, अनुकूल परिस्थितीतही साथ देणाऱ्या सौ . सुवर्णा पाचपुते यांनी अडीच महिन्या पूर्वी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात फिक्स उमेदवार म्हणून फ्लेक्स लाऊन मतदार संघात दौरा केल्याने त्या प्रकाश झोतात आल्या गेल्या अडीच महिन्यात मतदार संघात फिरताना मिळालेला प्रतिसाद, मूलभूत प्रश्न मार्गी न लागल्याने लोकांचा सत्ताधाऱ्यां वरील रोष यातून आपण विजयी होऊ अशी आशा असल्याचे सांगून सौ. पाचपुते यांनी गेल्या १० वर्षात आपणावर पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडली पण पक्षाने २०१४,२०१९ मध्ये उमेदवारी दिली नाही बदल्यात जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला तोही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पाळला नाही असा आरोप करून २०१४ मध्ये भाजप ने कामाला लागा असा आदेश दिला पण पक्षात नव्या नेतृत्वाच्या प्रवेशाने उमेदवारी रद्द झाली पण आपण पक्ष वाढीसाठी काम केले विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या साठी प्रचार केला काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रताप पाचपुते यांचा प्रचार केला ,सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी सौ . प्रतिभा पाचपुते प्रचार केला ,लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा प्रचार केला त्यामूळे पक्ष नक्की दखल घेईल लोकांची मागणी काय आहे याचा आदर पक्ष करेल असे सांगून सौ. पाचपुते यांनी पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी कारण भाजप घराणे शाही चा पुरस्कार करणारा पक्ष नाही.

मतदार संघातील फ्लेक्स,दौरा,सुख दुःख,लग्न सोहळे,सामाजिक कार्यक्रमात सहभाग यासाठी रसद पुरवली जाते का? अशी चर्चा असल्याचे पत्रकारांनी विचारता सौ . पाचपुते म्हणाल्या माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही,संस्था नाही माझा सर्व खर्च वडील शिवाजीराव नांद्रे हे आपल्या शेतातील उत्पादन विकून करत आहेत असे स्पष्ट करून आम्ही कोणाच्या प्रलोभनाला बळी पडणारे नसून आम्हाला पैशाने कोणी खरेदी करू शकत नाही आम्ही कोणाच्या आदेशाने उमेदवारी करत नसून कोणाच्या आदेशाने माघार देखील घेणार नाही 

सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दररोज लोकांच्या प्रश्नात असून मतदार संघात कुकडी,घोड आवर्तन, डिंभे - माणिकडोह बोगदा, साकळाई उपसा जलसिंचन प्रकल्प,उपजिल्हा रुग्णालय,कृषि महा विद्यालय हे पारंपरिक प्रश्न राजकीय अनास्थे मुळे सुटू शकले नाही ही या मतदार संघाची शोकांतिका असून हे चित्र बदलण्यासाठी माझी उमेदवारी असून मतदारांनी आज पर्यंत अनेकांना संधी दिली पण प्रश्न जैसे थे राहिल्याने मतदारांनीच मला दौऱ्या दरम्यान या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उमेदवारी करण्याचा आग्रह धरला असून उमेदवारी करणारच याचा पुनरुच्चार करून मतदार संघात कोणत्याही आघाडी चे वातावरण नसून लोकच आता बदलाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सर्वात कमी खर्चात आपण विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.



भाजप उमेदवारी देईल का असे विचारता सौ . सौ.सुवर्णा ताई पाचपुते म्हणाल्या मी पक्ष बदलला नाही आणि २० वर्षात पक्षाचे ध्येय धोरणे राबवले,पक्ष वाढवला स्वर्गीय दिलीप गांधी, अभय आगरकर, मा.खा.सुजय विखे,आ.बबनराव पाचपुते, माजी मंत्री आ.राम शिंदे,स्व.सदाशिव पाचपुते,शिरूरचे बाबुराव पाचर्णे आदींचा प्रचार केला २०१४ आणि २०१९ मध्ये उमेदवारी साठी मुलाखत दिली पक्ष आपली निष्ठा आणि काम पाहून न्याय देईल - सौ. सुवर्णा पाचपुते : भाजप नेत्या,श्रीगोंदा


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष