मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

By : Polticalface Team ,15-10-2024

मोठी बातमी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 ला निकाल

नवी दिल्ली/मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि. 15) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच    टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रासह निवडणूक आयोगाने झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभांच्या तारखांचीही घोषणा केली आहे. या ठिकाणी दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार पहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर, दुसरा टप्पा 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. (Election Commission OF India Announced Maharashtra & Jharkhand Assembly Election Scheduled )


काय म्हणाले निवडणूक आयुक्त?

महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9.63 कोटी आहे, त्यापैकी 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदार आहेत. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 20.93 लाख आहे. यातील 234 जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. व्होटर हेल्पलाईन अॅपमध्ये त्यांचे मतदान नेमके कुठे आहे, ते पाहू शकतील असेही राजीव कुमार यांनी सांगितले. याशिवाय मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण होणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात एक लाख 186 पोलिंग बुथ असतील.

कसं असेल शेड्यूल?

विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

मागील वेळी किती टप्प्यात झाल्या होत्या निवडणुका?
या आधी म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, सत्तास्थापनेसाठी 145 चे बहुमत आवश्यक आहे. गेल्यावेळी म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 105, शिवसेना- 56, राकांपा- 54, काँग्रेस – 44 अपक्ष – 13 तर, अन्य- 16 जागा मिळाल्या होत्या.


तर, 2019 मध्ये झारखंड विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात झाली होती. यात पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा 12 डिसेंबर, चौथा 16 डिसेंबर आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 डिसेंबर रोजी झाले होते. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले होते.

निर्णयांचा अन् योजनांचा पाऊस 

विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारकडून गेल्या काही दिवसात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये निर्णयांचा धडाका लावला होता. यात अंगणवाडी सेविकांचे आणि होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर, काल (दि.14) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनाही जाहीर करण्यात आली होती. या योजनेतंर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


महायुती-महाविकास आघाडीचं बलाबल 
महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)


महाराष्ट्र विधानसभा 2019 निकाल आणि पक्षीय बलाबल

भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद

नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान

खत आणि त्यावरील जबरदस्तीने दिले जाणारे खत; याबाबत शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात..!

दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.

कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक दोन्ही रूमच्या कुलपांना सिल केल्या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.

कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा

परिक्रमा तंत्रनिकेतनच्या कबड्डी संघाचे घवघवीत यश

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे मढेवडगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने माजी सेवा निवृत्त पोलीस दिलीप निवृत्ती दोरगे यांचा जागीच मृत्यू.

सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा

५१ हजार रूपयांच्या देणगीतून साकारतेय सभामंच व ध्वजस्तंभाचे काम - शिंदे वहिनींच्या दातृत्वाला सलाम! !

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे

श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि जीवन सुंदर बनवा - सुरेंद्र गुजराती

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन