By : Polticalface Team ,16-10-2024
बारामती जनआधार न्युजभिमसेन जाधव बारामती :
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण त्रास देणाऱ्या व उगीचच दुचाकीवरून फिरणाऱ्या टुकारांना दणका देत बारामतीच्या वाहतूक शाखेने टी.सी. कॉलेज परिसरात आज मोहीम राबवत तब्बल 84 वाहन चालकांना पाऊण लाखांचा दंड ठोठावला. बारामती शहरातील तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरात काळ्या काचा लावून फिरणारे वाहनचालक चांगलेच वाढले आहेत आणि दुसरीकडे महाविद्यालयाच्या परिसरात टुकार, सडकसख्याहारी, रोडरोमिओ आणि उगीचच बेशिस्तपणे दुचाकी चालवून रस्त्यावरील नागरिक विद्यार्थी, विद्यार्थिनींना त्रास देणारे देखील वाढले आहेत. या सर्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती त्यामुळे आज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून मोटार वाहन कायद्यांतर्गत मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरात मुला-मुलींची मोठया प्रमाणात रहदारी असते.त्या ठिकाणी मोक्कार विनाकारण फिरणाऱ्या टुकार तरुणांकडून बुलेट गाड्यांचे सायलेंसर काढून मोठा फटाका आवाज काढण्याचे प्रकार घडत असल्याबाबत वाहतुक शाखेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत्या. यावर ठोस कारवाई म्हणून ही कारवाई करण्यात आली. आज (दि.१४ रोजी) सकाळी १० ते १. ३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अशा हुल्लडबाजांवर मोटार वाहन कायद्यांखाली वेगवेगळ्या कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये विनापरवाना वाहन चालवणाऱ्या सहा प्रकरणात ३० हजार रुपये दंड ठोठावला, तर वाहन चालक परवाना न बाळगण्याची ४६ प्रकरणे शोधून २३ हजार रुपयांहून अधिक दंड करण्यात आला, फॅन्सी व खराब नंबर प्लेटची ११ प्रकरणे समोर आली, त्यामध्ये ५ हजार ५०० रुपये दंड व ट्रिपल सीटची १० प्रकरणे व १० हजार रुपये दंड, काळी काच लावून फिरत असलेल्या वाहनावरही दंड करण्यात आला. मोटार वाहन कायद्याखाली वेगवेगळ्या कलमानुसार एकूण ८४ प्रकरणातून ७० हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केली असून या कारवाईत बारामती वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार प्रशांत चव्हाण, सुभाष काळे, पोलीस हवालदार प्रदीप काळे, महिला पोलीस हवालदार स्वाती काजळे, रूपाली जमदाडे, सीमा साबळे, माया निगडे, सविता धुमाळ, रेश्मा काळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य कदम व प्रज्योत चव्हाण आदींनी
वाचक क्रमांक :