संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार : प्रवक्ते तळेकर

By : Polticalface Team ,16-10-2024

संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब झाल्याने मतदार आता बदल करणार  : प्रवक्ते तळेकर

करमाळा प्रतिनिधी :संजयमामा शिंदे यांच्या आमदार पदाची व्हॅलिडिटी संपली, पाच वर्षे विकासाचे नेटवर्क गायब असल्याने मतदार आता सेवेत बदल करणार असून नारायण (आबा) पाटील यांना संधी देणार असा आत्मविश्वास प्रवक्ते सुनील तळेकर व्यक्त केला. काल विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारी बाबत बोलताना त्यांनी सांगितले कि महाविकास आघाडी मार्फत अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार नारायण आबा पाटील हे निवडणूक रिंगणात उतरतील. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा बी फॉर्म हा नारायण (आबा) पाटील यांनाच मिळणार असल्याने तुतारी घेतलेला माणूस हेच पाटील यांचे निवडणुकीतील चिन्ह असेल. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी गावभेट दौरा करून करमाळा मतदार संघ पिंजून काढला आहे. करमाळा तालुक्यात मतदारांचा एक सर्वाधिक मोठा जनाधार नारायण आबा पाटील यांच्या पाठीशी आहेच पण या मतदार संघास जोडलेल्या माढा मतदार संघातील कुर्डुवाडी सह छत्तीस गावातही माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे स्वागत मतदारांनी मोठ्या उत्साहात केले आहे. या गावभेट दोऱ्यात सभेस मोठ्या प्रमाणात मतदार जमत होते. विशेष म्हणजे या छत्तीस गावातील मतदार हा विद्यमान आमदार संजय शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज असून तो आता आमदार शिंदे यांच्या विरोधात बोलू लागल्याचे बहुतांश गावातून आम्हाला दिसून आले. यामुळे संपूर्ण करमाळा मतदार संघ हा विद्यमान आमदार यांच्या निष्क्रियते बाबत मनात राग ठेवून असून सतत संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेल्या विद्यमान आमदारांना घरी पाठवून आता सत्तेत बदल करण्याच्या मनस्थिती मध्ये आहे. यामुळे जनतेनेच आजपासून ही निवडणूक हाती घेतली असल्याने नारायण (आबा) पाटील हे आमदार होणार हे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष व पदाधिकारी हे आमच्यासाठी सन्माननीय असून या सर्वांची माजी आमदार नारायण आबा पाटील यांना भक्कम साथ आहे. निवडणुकी साठी कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी सज्ज असून माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या उमेदवारी अर्जाची आमची तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा व महाविकास आघाडीचा एकत्रीत जाहीरनामा हा या मतदार संघातील जनतेच्या विकासाच्या मुद्द्याना प्राधान्य देणारा असणार आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे आशीर्वाद माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या पाठीशी असल्याने मतदारांचा कल हा लोकसभे प्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही तुतारी वाजवण्याच्या बाजूने आहे. यामुळे आता माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या विजयासाठी प्रत्यक्ष मतदार राजाच्या जास्तीत जास्त संपर्कात येऊन मतदानाची टक्केवारी वाढवून माजी आमदार नारायण आबा पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील असेही प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष