By : Polticalface Team ,16-10-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी :काल मंगळवार दि...15 ऑक्टोबर रोजी रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापक व सर्व सेवक वृंदांच्या हस्ते कलामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .तदनंतर स्वरा खामकर , गीतांजली पवार , समीक्षा तावरे, छकुली उबाळे या विद्यार्थिनींची भाषणे झाली .कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती सुमती सुरसे यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती अर्चना कोरडे यांनी ए. पी. जे .अब्दुल कलाम यांच्या भारतीय क्षेपणास्त्राच्या कार्याची माहिती सांगून वाचणं प्रेरना दिनाचे महत्त्व सांगितले त्यानंतर श्री यदलोड शंकर यदलोड यांनी विधानसभा 2024 निवडणुका पोल डे विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मीनाक्षी कदम यांनी विद्यार्थ्यांना जागतिक हात धुवा या उपक्रमा संदर्भात प्रात्यक्षिकासहित सखोल मार्गदर्शन केले .
अत्यंत नियोजनबद्ध व दिमाखदार रीतीने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु स्वरा खामकर व आभार प्रदर्शन कू गीतांजली पवार हिने केले. अत्यंत उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
वाचक क्रमांक :