By : Polticalface Team ,17-10-2024
करमाळा-प्रतिनिधी
शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दलित चळवळीतील युवा नेते तसेच सामाजिक कार्यात नियमित अग्रेसर असणारे दशरथ कांबळे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे मराठा सेवा संघाचा ३४ वा. वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आला. यावेळी करमाळा तालुक्यातुन विविध सामाजिक पातळीवर समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मराठा मार्गदर्शक सन्मान पुरस्कार, मराठा मित्र पुरस्कार, मराठा भुषण पुरस्कार, विशेष सामाजिक गुणगौरव पुरस्कार, उत्कृष्ठ अंगणवाडी सेवा पुरस्कार, मराठा रणरागिणी पुरस्कार, मराठा मित्र व गुणगौरव पुरस्कार इ. पुरस्कारांच्या माध्यमातुन समाजासाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तम माने हे होते. तर प्रमुख उपस्थितीत किरण घाडगे, बाळासाहेब बागल, मनोज राऊत, गणेश करे-पाटील, विलासराव घुमरे सर इ. जण होते. यावेळी दशरथआण्णा कांबळे, ॲड. सविता शिंदे, गणेश करे-पाटील, विलासराव घुमरे सर, मनोज राऊत, किरणराज घाडगे इ. मान्यवरांनी त्यांची मनोगते व्यक्त केली. सदरच्या कार्यक्रमामध्ये मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव हा एकमेव पुरस्कार दिल्यामुळे, या पुरस्काराला विशेष महत्व असल्याचे मानले जात आहे. सदरचा पुरस्कार देतेवेळी करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकिय क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर मंडळी उपस्थित होते. दलित चळवळीतील युवा नेते माननीय दशरथ अण्णा कांबळे यांनी गेली कित्येक वर्षापासून विविध स्तरावर सामान्य कार्यकर्त्यांचे अडीअडचणी सोडविणे तसेच साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बिले संदर्भात शासकीय दरबारी आंदोलने आदि विविध सामाजिक प्रश्नावर कांबळे यांनी लढा दिला आहे या आणि अशा सर्व उल्लेखनीय सामाजिक व नावलौकिक उत्कृष्ट कार्य बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे मराठा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले
मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त, माझा मराठा मार्गदर्शक सामाजिक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदरचा पुरस्कार मला दिल्यामुळे माझी सामाजिक जबाबदारी आणखी वाढली आहे. मानवधर्म हि एकमेव जात असुन आतापर्यंतचे माझे कार्य त्या अनुषंगानेच सुरु आहे. आणि ते दबलेल्या, पिचलेल्या आवाजासाठी नेहमी असेच सुरु राहील. -दशरथआण्णा कांबळे (शेतकरी कामगार संघर्ष समिती)
वाचक क्रमांक :