By : Polticalface Team ,18-10-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी) :- गेल्या चाळीस वर्षे आमदारांनी विधानसभेत कधी एखादा तरी प्रश्न मांडला आहे का? विधानसभेत श्रीगोंदा च्या मुद्यावर एखादा प्रश्न मांडताना कधी कोणी पाहिले आहे का? असा सवाल करून श्रीगोंदा तालुक्याचे प्रश्न नाहीत का ? त्या प्रश्नांना कोण वाचा फोडणार, घोड, कुकडी बाबत कोणी प्रश्न मांडत नाहीत. सर्वांना नागवडे यांनी संधी दिली. परंतु नागवडे यांना मात्र कोणी संधी द्यायला तयार नाही. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नागवडे जशास तसे उत्तर देणार आहे. कुठल्याही कोणत्याही पक्षातून, कोणत्याही चिन्हावर, विधानसभा निवडणूक लढवणारच आहे असे प्रतिपादन कोळगाव येथे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी केले.
जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अनुराधा नागवडे यांनी अहिल्यानगर तालुका व श्रीगोंदा तालुक्यामध्ये मतदारांशी संपर्क साधला, कोळगाव येथे जन आशीर्वाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या नलगे या होत्या.यावेळी अनुराधा नागवडे म्हणाल्या की, श्रीगोंदा कारखान्याने कधी कामगारांची पेमेंट थांबवले नाही, शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांचे पेमेंट थांबवले नाही. जे काम होणार आहे ते आम्ही काम करतो, जे होणार नाही त्यास नाही म्हणतो.अशी आमची भूमिका असल्याने श्रीगोंदा तालुका नागवडे मुळे सुरक्षित आहे. कारण विरोधकांना नागवडे यांच्या नैतिकतेचा धाक आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये मुली पळवून घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देणारा श्रीगोंदा तालुका हवा आहे का? असं सवाल करून येत्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी आम्हाला विचारणा केली आहे. पण काहीजण इलेक्शन जवळ आले की पुड्या सोडतात, भूमिपूजन करतात. परंतु विधानसभेला निवडून आल्यास श्रीगोंदा तालुक्यामध्ये टक्केवारी गोळा करणार नाही तर तालुक्यामध्ये बेरोजगारांसाठी एमआयडीसी, आरोग्याच्या प्रश्नांसाठी होलेवाडी येथे हॉस्पिटलची उभारणी, महिलांसाठी उद्योग, शिक्षण व पाणी या प्रश्नावर काम करणार आहे. असे प्रतिपादन अनुराधा नागवडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी हनुमंत लगड, मोहन लगड, बन्सी लगड, संकेत नलगे, प्रतीक लगड, सागर नलगे, नितीन शेलार, पंकज लगड, गणेश लगड, जय लगड, अनिकेत लगड, अमर लगड, काशिनाथ महाराज शिंदे, उल्हास घाडगे, अनिल नलगे, राहुल लगड, सुधाकर मोरे, अमित नलगे, नवनाथ काळे, संजय लगड, वैभव नलगे संजय मेहेत्रे, भरत लगड यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्केट कमिटीचे संचालक रामदास झेंडे यांनी केले तर दादासाहेब धोंडगे, सचिन लगड यांनी आपली मनोगत व्यक्त केली. आभार प्रदर्शन प्रणाली पाटील यांनी केले.
वाचक क्रमांक :