By : Polticalface Team ,18-10-2024
पुणे : जळगावचे जेष्ठ साहित्यिक, कवीवर्य, कादंबरीकार, गीतकार, इतिहास अभ्यासक, लेखक मा.श्री.ज्ञानेश पांडुरंग मोरे यांना "गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या" वतीने दिला जाणारा मानाचा प्रथम राज्यस्तरीय "महाराणी येसुबाई साहेब साहित्यरत्न पुरस्कार - २०२४ " जाहिर झाला असल्याची माहिती गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष तथा नरवीर तानाची मालुसरे यांचे वंशज कुणालजी मालुसरे तसेच ट्रस्टचे कार्याध्यक्ष तथा ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे (महाराणी येसुबाईंचे) वंशज श्रीमंत दिपकराजे शिर्के यांनी दिली.
*पुरस्कार प्रदान सोहळा ऐतिहासिक राजघराणे व सरदार घराण्यातील वंशज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार ;*
पुरस्कार प्रदान सोहळा पुणे, लोहगाव येथील साई डिफेन्स व पोलिस करियर अकादमी येथे दि. २० ऑक्टोबर वार रविवार रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता ऐतिहासिक राजघराणे व सरदार घराण्यातील वंशज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व इतिहास प्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे उपाध्यक्ष अमित गाडे पाटील, सचिव सरदार मंगेशदादा शिळीमकर, खजिनदार : श्रीमंत संतोषराजे गायकवाड यांनी केले आहे.
गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे संस्थापक मा. श्रीमंत शिवाजीराजे भोसले (तंजावर), मार्गदर्शक: श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज (सातारा), श्रीमंत छत्रपती संभाजीराजे महाराज (कोल्हापूर), श्रीमंत जयसिंगराजे महाराज (नागपूर) तसेच कमिटीचे प्रमुख सल्लागार : श्रीमंत मुधोजीराजे भोसले (नागपूर) , पद्मश्री मुरलीकांत पेटकर, सरखेल रघुजी आंग्रे, ट्रस्ट विश्वस्त : संदीपदादा मोहिते पाटील, रविंद्रजी कंक, राजाभाऊजी पासलकर, समीरदादा इंदलकर, शिवाजीराजे जाधव, गजेंद्रजी गडकर घोरपडे, युवराजजी जेधे, समीरराजे जाधव, आबासाहेब गोळे, सत्यजीतसिंह गुजर, कपिलदादा मिसाळ, राजेंद्र पवार वेरूळ, अजयदादा साळुंखे तुळजापूर,भोपे प्रशांतदादा कदम तुळजापूर, विक्रमसिंह मालुसरे, आदींसह अन्य वंशज सरदार घराण्यातील ही मान्यवर ट्रस्टवर कार्यकरत आहेत.
जेष्ठ साहित्यिक मोरे यांनी स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांची राजकन्या.. राजमाता जिजाऊंच्या नातसुन..छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा..स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांच्या लाडक्या बहिणाबाई.. छत्रपती थोरले शाहूमहाराजांच्या राजमाता.. महापराक्रमी, शौर्य आणि धैर्याचा महामेरू असलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांच्या धर्मपत्नी रणरागिणी महाराणी येसूबाई साहेबांच्या बाल्यावस्थे पासून तर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंतचा जवळपास ७१ वर्षांचा जीवनपट कादंबरीत शब्दबद्ध केला असून महाराणी येसूबाई यांच्या आक्षेप खंडन कादंबरीची एकूण ३७० इतकी पृष्ठसंख्य आहे.
त्यांचे काव्यसंग्रह सोनपहाट, बाल मजुरांच्या समस्येवरील राबणारे कोवळे हात, हिरवाईची गाणी , शिवार पाणी , ढेलारी ही भटक्या जमातीवरची ग्रामीण कादंबरी, ढाबळ, मोगलकालीन ऐतिहासिक प्रेमकथा गुलारा बेगम, चरित्रात्मक तो हा पांडुरंग, माती-बुक्का ( काव्यसंग्रह ), रेल्वे हमाल ( कुली ) यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित "बिल्ला" कादंबरी, असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून संत तुकाराम, सरदार येसाजी कंक, शंभुराजेंच्या जीवनावर "शंभुचरित्रम" आदि पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत त्यांची एकूण २१ ते २२ ग्रंथ साहित्य वाचकांना उपलब्ध आहेत. दुर्लक्षित स्वराज्यनिष्ठ, कर्तृत्ववान घराणे श्रीमंत राजेशिर्के घराण्यावर देखील त्यांचा लिहिण्याचा मानस आहे. साहित्यिक मोरे यांना राज्य शासनाकडून तसेच अन्य राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २८ पुरस्कारांनी गौरविले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष