मितेशकुमार नाहाटा यांची महाराष्ट्र राज्य जैन समाज अल्पसंख्यांक महामंडळाच्या व्हा. चेअरमनपदी निवड
By : Polticalface Team ,18-10-2024
श्रीगोंदा:- लोणी व्यंकनाथ गावचे भूषण स्व. बन्सीलाल नाहाटा यांचे नातू आणि बाळासाहेब नाहाटा यांचे चिरंजीव मितेशकुमार नाहाटा यांची महाराष्ट्र राज्य जैन समाज अल्पसंख्यांक महामंडळाच्या प्रथम व्हा. चे अरमनपदी (उपमंत्री दर्जा) निवड झाली. महामंडळावर मितेशकुमार नाहाटा यांची नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः शिफारस केली. त्यांच्या शिफारसीनुसार मितेश नाहाटा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून या महामंडळावर व्हा. चेअरमन म्हणून नियुक्ती झाली. यापूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब नाहाटा यांना महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष करीत महाराष्ट्र राज्याच्या कृषी आणि पणन महामंडळावर संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. आता हे दुसरे राज्य पातळीवरचे पद अजितदादा पवार यांनी दिल्यामुळे लोणी व्यंकनाथ गावाचे नाव तालुक्यासह महाराष्ट्राच्या नकाशावर गेले. त्यांच्या कार्यामुळे लोणी व्यंकनाथ गावातील युवा पिढीला प्रेरणा मिळेल आणि समाजाच्या विकासासाठी नवे वाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मितेश नाहाटा यांचा सामाजिक कार्यातला अनुभव आणि त्यांनी केलेले प्रयत्न यामुळे हा नव्या पदासाठी त्यांचा मार्ग सुसाध्य झाला. लोणी गावातली लोकसंख्या आणि त्यांच्या हितासाठी मितेश नाहाटा यांचे कार्य महत्वाचे ठरेल, अशी खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक :