आवाटीच्या वलीबाबा दर्ग्यात सोमवार,21 ऑक्टोंबर रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन...‌

By : Polticalface Team ,18-10-2024

आवाटीच्या वलीबाबा दर्ग्यात सोमवार,21 ऑक्टोंबर रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन...‌ करमाळा : प्रतिनिधी हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक असणाऱ्या आवाटी येथील सुफी हजरत वली चांद पाशा दर्गाह मध्ये येत्या सोमवार,21 आक्टोबर 2024 उर्दू तारीख 17 ग्यारहवी शरीफ हिजरी सन 1446 रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी दिली आवाटी येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी जश्ने गौसे आजम निमित्त दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत जियारते मुए मुबारक आणि गिलाफे मुबारक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय तोशे की नियाज चे आयोजन करण्यात आले आहे. आलेल्या भक्तगणांना दिवसभर लंगर खाना अर्थात महाप्रसाद देण्यात येणार आहे. सदर लंगरखानाचा आस्वाद भाविक भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. जश्ने गोसे आजम निमित्त आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून राज्य तसेच परराज्यातून आलेल्या भक्तगणाची राहण्याची व पार्किंगची व्यवस्था दर्गाह ट्रस्टच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. सध्या पवित्र असा ग्यारहवी शरीफ चा महिना असून या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव बगदाद शरीफ येथील हजरत गौसे आजम यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्यारहवी शरीफ महिना मोठ्या उत्साहात साजरा करतात. याचाच एक भाग म्हणून आवाटी येथील दर्गाह मध्ये गौसे आजम चा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. सदरच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने वली बाबा चे खादीम गुलामनबी कादरी , इरफान कादरी व बाबाचे सज्जादे नशीन सुफी हसनैन कादरी यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी