तीन दिवसांत भारताची २० विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी;लंडन-जर्मनीशी कनेक्शन, मोदी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत

By : Polticalface Team ,18-10-2024

तीन दिवसांत भारताची २० विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी;लंडन-जर्मनीशी कनेक्शन, मोदी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत

जनआधार न्युज

भिमसेन जाधव

तीन दिवसांत भारताची २० विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी; लंडन-जर्मनीशी कनेक्शन, मोदी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


तीन दिवसांत २० विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. (AP Photo)

 गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अनेक धमक्या अथवा अफवा समोर आल्या आहेत. यामुळे विमान कंपन्या व त्या-त्या विमानतळ प्रशासनांची पाचावर धारण बसते. त्यांना पुन्हा तपास करावा लागतो, बॉम्ब शोधणाऱ्या पथकाला पाचारण करावं लागतं, विमानतळावरील व्यवस्थापनात बदल करावा लागतो. यात वेळ आणि अमाप पैसे खर्च होतात, मात्र हाती काहीच लागत नाही. या धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत बॉम्बने विमान उडवून देण्याच्या जवळपास २० हून अधिक धमक्या आल्या आहेत. या अशा प्रकराच्या घटनांची केंद्र सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे. २० विमानं बॉम्बने उडवण्याच्या धमक्या आल्या असून त्यात आंतरराष्ट्रीय विमानांचा देखील समावेश आहे. यापैकी अनेक विमानांचे मार्ग देखील बदलावे लागले. मात्र, सर्व धमक्या खोट्या ठरल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास केला असून समाजमाध्यमांवर अशा धमक्या ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून आल्या आहेत ते आयपी अ‍ॅड्रेस शोधून काढले आहेत. हे आयपी अ‍ॅड्रेस लंडन व जर्मनीमधील असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे.

 *केंद्रीय तपास यंत्रणा धमक्या देणाऱ्यांच्या मागावर* 

इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार सोमवारी तीन आंतरराष्ट्रीय विमानं बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या, तर मंगळवारा १० विमानांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या. तर, बुधवारी अशा सहा घटना समोर आल्या. सर्व धमक्या समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या अकाउंट्सवरून देण्यात आल्या होत्या. हे सर्व अकाउंट्स बनावट असल्याचं समोर आलं आहे. या धमक्यांसाठी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर केला गेला आहे. त्यानंतर, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक्सकडून त्या अकाउंट्सचा आयपी अ‍ॅड्रेस मागितला. तसेच हे अकाउंट्स बंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी सांगितलं, याबाबतचा प्रारंभिक अहवाल आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की या पोस्ट तीन वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून करण्यात आल्या आहेत. यापैकी दोन अकाउंट्सचे आयपी अ‍ॅड्रेस लंडन आणि जर्मनीमधील आहेत. या युजर्सनी पोस्ट करण्यासाठी विशिष्ठ व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा (VPN) वापर केला आहे. जेणेकरून ते त्यांची ऑनलाइन ओळख लपवू शकतील. तसेच तिसऱ्या अकाउंटची माहिती अद्याप मिळालेली नाही. आम्ही अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.