By : Polticalface Team ,19-10-2024
दौंड (प्रतिनिधी ) या अ,ब,क,ड वर्गीकरणासाठी अनेक मातंग समाजातील तरुणांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. अनेक संघटनानीयासाठी लढा दिला. अनेक तरुणांनी,महिलांनी यासाठी लाट्या खाल्ल्या,पण शेवटी विजय मात्र सत्याचाच झाला.
१५/१०/२०२४ रोजी
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या संदर्भात निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या हस्ते हा उपवर्गीकरणाचा जीआर आमदार अमितजी गोरखे यांच्या हातात सुपूर्द केला.
त्यामुळे सगळीकडेच उत्सवाचे वातावरण तयार झाले,यामुळे भविष्य काळात अनुसूचित जातीतील सर्वाना याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करत मातंग समाजाच्या वतीने दौंड येथील, साहित्यसम्राट,डॉ.आण्णाभाऊ साठे समाजमंदिर येथे मातंग बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद साजरा केला.
त्यावेळी मातंग समाजातील लहुजी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष- नितीनभाऊ तूपसौंदर्य त्यांनी आपले मत व्यक्त केले व उपस्थित पत्रकार योगिताताई रसाळ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश तूपसौंदर्य, सागर कांबळे,धीरज दिवटे,निखिल ससाने,महेश गायकवाड,गणेश खंडागळे,तुकाराम तूपसौंदर्य,शुभम तूपसौंदर्य,मयूर तूपसौंदर्य, सौरव आगलावे,ओमकार खुडे आणि सर्व समाज बांधवांनी मिळून आनंद उत्सव साजरा केला.
वाचक क्रमांक :