By : Polticalface Team ,20-10-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणूक ही आता महाविकास आघाडीतूनच कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळो अगर न मिळो परंतु आता कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे यांनी दर्शवली आहे. कार्यकर्त्यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीतून माघारी नको अशा भावना व्यक्त करत निश्चितपणे नागवडे कुटुंबातील आमदार होणार असल्याच्या तीव्र भावना नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केल्या आहेत. प्रस्ताविक नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले.
तालुक्यातील वांगदरी येथील अंबिका माता मंदिराच्या प्रांगणात नागवडे समर्थकांचा भव्य असा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हे होते. याप्रसंगी नागवडे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या नगर श्रीगोंदा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक उमेदवारी बाबत आपल्या परखडपणे भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले आहे की; सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये सत्ता नसतानाही आपले भरीव व प्रामाणिक योगदान देत तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला पूर्वपदावर आणण्यासाठी गेली 50- 60 वर्ष अहोरात्र संघर्ष करून सहकार महर्षी बापूंनी सहकार; शिक्षण; कृषी व सिंचन क्षेत्रात खऱ्या अर्थाने नागवडे कुटुंबाने मोठा त्याग केला आहे. त्यातूनच आज सर्वसामान्य शेतकरी बापूंच्या त्यागातून सक्षमपणे उभा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. आणि तोच बापूंचा वारसा खऱ्या अर्थाने सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; सौ अनुराधाताई नागवडे; दीपक शेठ नागवडे; व संपूर्ण त्यांचे कुटुंब आज सर्वसामान्यांचे सुखदुःख जाणून घेत आहेत. राजेंद्र दादा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदारी देखील उत्तम प्रकारे चालवली जात आहे. ऊस उत्पादकांची वेळेत देणे; कामगारांचे वेळेत पगार त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नागवडे कुटुंबातीलच आमदार विधानसभेत गेला पाहिजे अशा तीव्र भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
प्रामुख्याने नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे; अशोक रोडे; रामदास झेंडे; शहाजी गायकवाड; गावडे ताई; सतीश मखरे; किरण धावडे; मच्छिंद्र तरंगे; प्रणाली पाटील; संदीप पंदरकर; बंडू पंधरकर गणेश बेरड; मेजर नलावडे; राकेश पाचपुते; माऊली हिरवे; राजेंद्र ढवळे; संजय डाके; प्रशांत गोरे; बाबा महाराज झेंडे; मुकुंद सोनटक्के आदींनी आगामी विधानसभा निवडणूक नागवडे कुटुंबांनी महाविकास आघाडीचे तिकीट मिळणार आहे; तेव्हा कोणत्याही पक्षातून महाविकास आघाडीचे तिकीट मिळाले तरी त्या तिकिटावर लढावे अन्यथा शेवटी अपक्ष देखील लढावे; माघार घ्यायची नाही अशी ठाम भूमिका घेत आम्ही सैनिक म्हणून तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहोत. गेल्या 40 वर्षात ज्यां लोकप्रतिनिधींनी काम पाहिले; मात्र आजही तालुका विकासापासून दूर आहे. स्वतःचे साखर कारखाने देखील बंद पडले; प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत एमआयडीसीची घोषणा प्रत्यक्षात मात्र त्याचे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आज लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध नाही. याउलट नागवडे कुटुंबाने मात्र सत्यविना विकास घडवून आणला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नागवडे कुटुंबातीलच आमदार होणार आहे. सहकार महर्षी बापूंचे देखील उर्वरित तालुक्याचे विकासाचे स्वप्न निश्चितपणे अनुराधाताई नागवडे ह्या पूर्ण करतील; त्यामुळे प्रत्येकाने आपणच उमेदवार समजून अनुराधाताई नागवडे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घ्यावे असे आवाहन देखील या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सौ अनुराधाताई नागवडे या म्हणाल्या की; नगर श्रीगोंदा मतदारसंघातील प्रत्येक गावातील सर्वसामान्य माणूस व कार्यकर्ता यांच्या भावना नागवडे कुटुंबाविषयी आदरपूर्वक आहेत. नागवडे कुटुंबातीलच आमदार व्हावा ही अपेक्षा प्रत्येकाची आहे. असे सांगून सर्व नागवडे पुढे म्हणाल्या की देशाच्या विकासात ज्यांनी आपले योगदान दिले ते दिवंगत रतन टाटा सारखे सज्जन माणूस चालतो. मग नागवडे कुटुंब हे राजकारण समाजकारणात स्वच्छ व प्रामाणिक असतानाही काहींना अडचण ठरते ? अशी खंत व्यक्त करून नागवडे कुटुंबाने सहकार शिक्षण क्षेत्रात कोणाचेही वाटोळे केले नाही. अन्नात कधी माती कालवली नाही. प्रत्येक वेळी सामंज्याची भूमिका घेतली. यापुढेही राहणार आहे. त्यामुळे उद्या आपणच आमदार होणार आहे. त्यावेळी तुम्ही सर्वजण आमदार असणार आहे अशी खून गाठ प्रत्येकाने मनाशी बाळगून तालुक्यातील जनता नक्की आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. सर्वांनी आपापल्या गावात सतर्क राहून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे सहकार्य करावे. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस; राजेंद्र दादा नागवडे; दीपक शेठ नागवडे आदेश शेठ नागवडे यांच्यासह नागवडे कुटुंबावर प्रेम करणारे कार्यकर्ते ठामपणे उभे राहणार आहेत. या संवाद मेळव्यास उपस्थित राहिल्याबद्दल सौ अनुराधाताई नागवडे यांनी सर्वांचे अंतःकरण पूर्वक आभार मानले.
याप्रसंगी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी म्हणाले की; विधानसभेसाठी 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी असा सामना सर्वांना पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिलेला होता. रविवारी देखील अजित दादांची समक्ष भेट घेतली परंतु अजितदादांची भूमिका थांबा आणि पहा अशी दिसून आल्यानंतर आम्ही देखील आमची भूमिका अजित दादांना समजावून सांगितली. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की ;अजितदादा गटाकडून उमेदवारी मिळत नसेल तर आजच राष्ट्रवादी अजितदादा गटाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; बापूंनी दिलेल्या संस्कृतीचे आम्ही प्रामाणिकपणे जतन करत आहोत. आम्ही कोणाच्याही पायात पाय घातलेला नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही पाच वर्षापासून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही आपण चर्चा केली. दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडी कडून उमेदवारी बाबत वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली. परंतु त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बसून निर्णय घ्यावा लागेल. असे सांगितले. दोन दिवसांमध्ये निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे. अन्यथा तिकीट नाही मिळाले तरी अनुराधाताई नागवडे उमेदवारी करणारच आहेत. एवढ्यावरच थांबायचे नाही तर आमदार करणारच आहोत असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; कार्यकर्त्यांच्या भावना व नागवडे कुटुंबावर असलेले आम जनतेचे प्रेम या निवडणुकीच्या माध्यमातून प्रकट होणार आहे. बापूंचे व आम जनतेचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. दोन दिवसात ठाम निर्णय घेणार आहोत. असे सांगून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना यावेळी राजेंद्र नागवडे यांनी यावेळी दिल्या.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की; नागवडे कुटुंबांना महाविकास आघाडीचे तिकीट मिळणारच आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी गाफील न राहता नागवडे वहिनींना प्रचंड मताधिक्याने निवडून येण्यासाठी सहकार्य करावे .महाविकास आघाडीच्या तीन पक्षांचा दावा असल्याने दोन दिवसात महाविकास आघाडीचा निर्णय होणार आहे. अपक्ष निवडणूक करण्याची वेळ नागवडे कुटुंबावर येणार नाही. अशी ठाम भूमिका बाबासाहेब भोस यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी नगर श्रीगोंदा मतदारसंघातील कार्यकर्ते सरपंच उपसरपंच चेअरमन व्हॉइस चेअरमन यांच्यासह नागवडे कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :