By : Polticalface Team ,21-10-2024
लिंपणगाव प्रतिनिधी : लोहगाव पुणे येथील साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी येथे दि.२० ऑक्टोबर रोजी गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा मानाचा २०२४ चा प्रथम राज्यस्तरीय महाराणी येसुबाई साहेब साहित्यरत्न पुरस्कार जळगावचे प्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक, कवीवर्य, कादंबरीकार, इतिहास अभ्यासक, लेखक मा.श्री. ज्ञानेश मोरे यांना ऐतिहासिक राजघराणे व सरदार घराण्यातील वंशज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करत सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. दरम्यान शिव- चित्रकार मिलिंद विचारे यांनी साकारलेल्या महाराणी येसुबाई यांच्या फोटोप्रेम (तैलचित्राचे) प्रकाशन करण्यात आले. यावेळी लेखक मोरे यांनी स्वयंम लिखित महाराणी येसुबाई संभाजी भोसले कादंबरी व महाराणी येसुबाई प्रतिमा श्रीमंत दिपकराजे शिर्के व श्रीमंत लक्ष्मीकांतराजे शिर्के यांना भेट दिली.
पुरस्कार सन्मान सोहळा महाराणी येसुबाई यांच्या तैलचित्रासह शेकडो चित्र साकारणारे विश्वप्रख्यात शिव-चित्रकार मा.श्री. मिलिंद विचारे, स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के (महाराणी येसुबाई) यांचे वंशज माजी सैनिक सेलचे राज्यप्रमुख तथा ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्रीमंत दिपकराजे शिर्के, गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष तथा नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालजी मालुसरे, सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज रविंद्रजी कंक, सामाजिक नेते कैलास पाटील सोनवणे, शंभुसेनेचे किल्ले धर्मवीरगड येथील श्रीमंत लक्ष्मीकांतराजे शिर्के, श्री.भागवत कळसकर, गडदुर्गचे शिलेदार सचिनजी भोसले, पुरस्कारार्थी यांच्या पत्नी सौ.अनुराधा ज्ञानेश मोरे, जावई कागलचे विराजराव इंगळे सरकार, मुलगी सौ. सारिका विराजराव इंगळे सरकार, पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष अमित गाडे पाटील, सचिव सरदार मंगेशदादा शिळीमकर, खजिनदार संतोषजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी सैनिक सेल प्रदेश उपाध्यक्ष श्रीमंत राठोड, माजी सैनिक निवृत्त जीएसटी कमीशनर सुनील ढाणे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव सोनवणे, संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड, कॅप्टन रावसाहेब हराळ, सुभेदार संतोष सोनवळे, माजी सैनिक सेलचे हनुमंत कापरे, ज्ञानेश्वर साखरे, सैनिक नारी शक्ती अध्यक्षा सौ. कविताराजे शिर्के, उपाध्यक्षा सौ.सीताताई राठोड, अकॅडमी ट्रेनर स्वप्नील जोगदंड, रुपाली सोनवणे मॅडम, गडदुर्ग प्रेमी, शिव-शंभुभक्त, इतिहास प्रेमींसह सर्व स्टाफ, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास स्टाफ व प्रशिक्षणार्थींचे परिश्रम लाभले तर सुत्रसंचालन लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी केले.
वाचक क्रमांक :