By : Polticalface Team ,22-10-2024
जनआधार न्युज भिमसेन जाधव बारामती: वंचित बहुजन युवा पुणे जिल्हा पूर्व जिल्हा अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांची सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात ब्ल्यू पॅंथर सामाजिक संघटना स्थापनेपासून झाली. यामध्ये त्यांनी अनेक गोरगरीब लोकांची तसेच तरुणांची कामे करून दिली व सामाजिक चळवळीत महत्त्वाचे स्थान निर्माण केले.
निकाळजे हे वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून पक्षात एक निष्ठेने काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडी होण्याआधी ते भारिप बहुजन महासंघामध्ये पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी स्थापनेनंतर त्यांनी मा.जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांच्या कार्यकारणी मध्ये जिल्हा महासचिव पदी कार्यरत होते.
त्यानंतर त्यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष श्री राज यशवंत कुमार यांच्या कार्यकारणी मध्ये महासचिव पदी चांगली कामगिरी केली आहे. त्यांची कामगिरी पाहून पक्षाने त्यांना वंचित बहुजन युवा पुणे जिल्हा पूर्व जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यावर त्यांनी पूर्ण जिल्हा बांधणी करून मिळाल्या भागातील तालुक्यात तालुका, शहर बांधणी तसेच शाखा बांधणी केली. त्याचप्रमाणे चळवळीचा वारसा जपत राजकीय पदावर कार्यरत नसताना देखील त्यांनी अनेक समाज उपयोगी कामे केले आहेत. पक्ष
पदावर काम करत असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी आंदोलने, उपोषणे करत गोरगरीब जनतेचे लोकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच अनेक युवकांना चळवळी बाबत योग्य मार्गदर्शन करत त्यांना आपल्या पक्षाचे ध्येय धोरण पटवून देत पक्ष वाढीसाठी ही प्रयत्न करत आहेत.
त्यांची पक्षाप्रती निष्ठा व पक्षवाढी साठीचे प्रयत्न पाहता पक्ष श्रेष्ठी श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी मंगलदास निकाळजे यांना बारामती विधान सभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
वाचक क्रमांक :