पुण्यात काल 5 कोटींच्या नोटा सापडल्यानंतर आज आणखी एका कारमध्ये मोठं घबाड सापडलं, हडपसर पोलिसांची मोठी कारवाई

By : Polticalface Team ,23-10-2024

पुण्यात काल 5 कोटींच्या नोटा सापडल्यानंतर आज आणखी एका कारमध्ये मोठं घबाड सापडलं, हडपसर पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिनिधी : पुण्यात काल 5 कोटींच्या नोटा सापडल्यानंतर आज आणखी एका कारमध्ये मोठं घबाड सापडलं, हडपसर पोलिसांची मोठी कारवाई

 पुण्यात आणखी एका कारमध्ये मोठी रोकड सापडली आहे. दरम्यान, मोठी रक्कम सापडल्यानंतर पोलिसांनी निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला माहिती दिली: पुण्यात सोमवारी (दि.22) एका बड्या नेत्याच्या कारमध्ये 5 कोटींच्या नोटा सापडल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एका कारमध्ये मोठं घबाड सापडलं आहे. पुण्यातील हडपसर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. नाकाबंदीच्या वेळेस आज (दि.22) संध्याकाळी पोलिसांना एका गाडीत तब्बल 22 लाख 90 हजार रुपये रोकड सापडली आहे. दौंड होऊन पुणे मार्केट यार्ड या ठिकाणी गाडी जात होती. पोलिसांनी या गाडीची झडती घेतली असता 22 लाख 90 हजार रुपये रोकड या गाडीत आढळून आले आहेत. पोलिसांनी विचारपूस केली असता हा एक व्यापारी असल्याचे समजले आहे. कामानिमित्ताने तो मार्केट यार्ड या ठिकाणी चाललोय, असं व्यापाऱ्याने सांगितलं. 

 *पोलिसांकडून आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला पाचारण*

 दरम्यान,  या रकमेबद्दल कुठलंही समाधानकारक उत्तर या व्यापाऱ्याकडून मिळालेला नाही. या 22 लाख 90 हजार रुपयांबद्दलची कुठली स्पष्टता पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी या संदर्भातील माहिती आयकर विभाग आणि इलेक्शन कमिशन यांना दिले आहे. पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असताना आणि आचारसंहिता लागू झालेली असताना कारमध्ये पैसे सापडत असल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. 

 *रोहित पवारांचे गंभीर आरोप*  

सहा ते सात गाड्या होत्या, हा विषय नवीन असताना दुसरी माहिती समोर येते. पैशाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर हे सरकार करणार आहे. लोक पैशाला नाकारातील. महायुतीमध्ये असलेल्या एका नेत्यांची अडचण दुसरा नेता करतो, की काय अस वाटतंय.  लोकांसमोर सत्य येतंय की हे पैसे वाटणार आहे. अजून 30 दिवस  जायचे आहेत. लोकसभेत त्यांनी पैसे वाटले पण जनतेने पैशाला नाही तर महाविकास आघाडी सरकारला प्राधान्य दिले. महायुतीचा विश्वास लोकांवर राहिलेला नाही म्हणून ते पैसे वाटतात. 


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी