अखेर राजेंद्र नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा उबाठामध्ये पक्षप्रवेश !

By : Polticalface Team ,23-10-2024

अखेर राजेंद्र नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा उबाठामध्ये पक्षप्रवेश !

   लिंपणगाव (प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील सहकार क्षेत्रात मातब्बर घराणे समजले जाणारे नागवडे कुटुंबातील सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आज मुंबई येथे मोठ्या उत्साही वातावरणात मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा हजारो कार्यकर्त्यांसमवेत पार पाडला.

      दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचा विचार न झाल्याने नागवडे कुटुंबाने आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे सुपूर्द केले आणि महाविकास आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन-तीन दिवसापासून महाविकास आघाडीकडून नागवडे कुटुंबांना उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू होती. साजन पाचपुते यांच्याही नावाची महाविकास आघाडी कडून चर्चा सुरू होती. परंतु सहकारातील एक अग्रगण्य नागवडे कुटुंब हे राजकारणाबरोबरच समाजकारणामध्ये नागवडे कुटुंबांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे साजन भैय्या पाचपुते यांनी मनाचा मोठेपणा दाखवून महाविकास आघाडीकडून विशेषता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उमेदवारीसाठी मनाचा मोठेपणा दाखवत विश्वास व्यक्त केला. त्यामुळे नागवडे कटुंबांनी देखील साजन भैय्या पाचपुते यांना धन्यवाद दिले आहेत. सकारात्मक चर्चेनंतर नागवडे कुटुंबांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त आज 23 ऑक्टोबर रोजी ठरला गेला. पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी नागवडे कुटुंबांसह त्यांच्या तालुक्यातील नागवडे समर्थकांनी हातामध्ये शिवबंधन बांधले. यावेळी सुनंदाताई पाचपुते याही उपस्थित होत्या. पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर नागवडे समर्थकांनी तालुक्यात जल्लोष करत मोठा आनंद व्यक्त केला.

      दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वेगात वाहताना दिसत आहे त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात एकमेकांचे पारंपारिक विरोधक पाचपुते नागवडे अशी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लढत होणार आहे. याप्रसंगी शिवसेनाप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी नागवडे कुटुंबांच्या पक्षप्रवेशाबद्दल आनंद व्यक्त करत म्हणाले की; नागवडे कुटुंब हे सहकारातील अभ्यासू कुटुंब आहे. या कुटुंबांचे सहकार; कृषी; सिंचन; शिक्षण या क्षेत्रात मोठे योगदान लाभले आहे. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापूंच्या अथक प्रयत्नातून श्रीगोंदा तालुका हा सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर दिसून येत आहे. असे सांगून ठाकरे आणखी पुढे म्हणाले की; निश्चितच नागवडें कुटुंबाच्या या पक्षप्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात मशाल पेटणार आहे. त्यामध्ये पाचपुते कुटुंबातील साजन भैय्या पाचपुते यांचीही मोठी ताकद नागवडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. कार्यकर्त्यांनी देखील विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहावे; असे सांगून श्री ठाकरे पुढे म्हणाले की; राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. सर्वसामान्य माणूस महाविकास आघाडीचे सरकार येण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे; असे आवाहन देखील शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी पक्ष प्रवेश प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी