लिंपणगाव (प्रतिनिधी)-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे विखे परिवाराचे जवळचे स्नेही वसंत देशमुख याने संगमनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा ज" />
By : Polticalface Team ,27-10-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे विखे परिवाराचे जवळचे स्नेही वसंत देशमुख याने संगमनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्य बद्दल कारवाई करून तात्काळ अटक करण्याबाबत.
संगमनेर तालुक्यातील वसंत देशमुख आणि जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन नीतिमत्तेला शोभणार नाही असे अशोभनीय बेताल वक्तव्य केले आहे, यासंदर्भात तात्काळ वसंत देशमुख याला अटक करण्यात यावी हा समस्त महिला भगिनींचा अपमान आहे त्याचबरोबर त्याचा बोलविता धनी भाजपाचे नेते सुजय विखे यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच चिचोंडी पाटील येथील अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करून जीवे मारणाऱ्या आरोपी तत्काळ अटक करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालून दोषीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असे निवेदन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना देण्यात आले, यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर शहराध्यक्ष मनोहर पोटे,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनीताताई दरोडे, भूषण शेळके,धीरज खेतमाळी, कांतीलाल कोकाटे, शशिकांत पवार शिवाप्पा घोडके, ज्ञानेश्वर खेतमाळीस, नंदू ससाणे हे पदाधिकारी उपस्थित होते
वाचक क्रमांक :