By : Polticalface Team ,28-10-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी/शफीक हवालदार : नगर -श्रीगोंदा 226 विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांनी उमेदवारी दाखल प्रसंगी मोठे शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशाच्या गजरात निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांचे कार्यकर्ते; महिला; पुरुष; तरुण कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने या शक्ती प्रदर्शनमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शक्ती प्रदर्शन प्रसंगी सौ अनुराधाताई तुम आग बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत श्रीगोंदा शहर सौ नागवडे यांच्या उमेदवारीने दणाणून गेल्याचे दिसून आले. दरम्यान नगर -श्रीगोंदा मतदारसंघात सौ अनुराधाताई नागवडे यांनी गेल्या दोन अडीच वर्षापासून प्रत्येक खेडोपाडी जाऊन सर्वसामान्य व्यक्तींच्या गाठीभेटी घेत त्यांचे सुख दुःखामध्ये सामील झाल्या. भेटीदरम्यान सौ नागवडेताई तुम्हीच यावर्षी आमदार होणार अशा भावना यावेळी मतदारसंघात सर्वसामान्यांनी व्यक्त केल्या. त्यातून सौ अनुराधाताई यांना नगर श्रीगोंदा मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत आहे.सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांनी जोधपुर मारुती मंदिराच्या प्रांगणात महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते; महिला; पुरुष यांनी एकत्रित येऊन जोधपुर मारुती ते तहसील कार्यालयापर्यंत मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तत्पूर्वी काही प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर चांगदेव पाचपुते आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे उपनेते साजन भैय्या पाचपुते यावेळी बोलताना म्हणाले की; नागवडे कुटुंब हे समाजकारणामध्ये तालुक्यात अग्रेसर आहेत. तालुक्यात स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापूंच्या कामाची तोडच नाही. सध्याच्या लोकप्रतिनिधी कडे 40 वर्षे तालुक्याची सत्ता होती; परंतु तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांच्याकडून दुर्लक्षित राहिले; त्यामुळे सर्व तालुका वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. असे सांगून श्री पाचपुते आणखी पुढे म्हणाले की; नागवडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आपण दोन पावले मागे होऊन सौ अनुराधाताई नागवडे यांना उमेदवारी द्यावी; यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे साहेब; संजयजी राऊत यांच्याकडे आग्रह धरला आणि त्यामध्ये आम्हाला यश आले. निश्चितपणे तालुक्याचा सर्वांगीण विकास ह्या सौ अनुराधाताई नागवडे यांच्या रूपाने होणार आहे. आघाडीचा धर्म म्हणून माजी आमदार राहुल जगताप व काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी देखील आपल्या भूमिकेत बदल करून महाविकास आघाडीच्या सौ अनुराधाताई नागवडे यांना पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळावा. माझे वडील सदाशिव अण्णा पाचपुते असताना सर्वसामान्यांना न्याय मिळत होता. परंतु आजची परिस्थिती अत्यंत वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र दादा नागवडे यावेळी बोलताना म्हणाले की नागवडे कुटुंबाचे राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे उपनेते साजन भैय्या पाचपुते यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला. उमेदवारीसाठी अनुराधाताई नागवडे यांना पाठिंबा दिला उद्धव ठाकरे साहेब संजय राऊत यांनी देखील पक्षाचा एबी फॉर्म दिला असे सांगून श्री नागवडे आणखी पुढील राज्यात महाविकास आघाडीला उज्वल भविष्य आहे साजन पाचपुते यांनी देखील सामंजस्याची भावना मनाशी बाळगन आम्हाला पाठिंबा व्यक्त केला स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी सत्ता नसतानाही तालुक्याच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आम्ही त्यांचा वारसा तो खंबीरपणे चालवत असून ज्यांनी तालुक्याची चाळीस वर्षे सत्ता भोगली त्यांना स्वतःचे कुक्कुटपालन सस्था स्वतःचा कारखाना देखील चालवता आला नाही त्यामुळे तालुका विकासात मागे राहिला त्यातून बेरोजगारी वाढली गेली त्यामुळे जनतेच्या देखील लक्षात आलेले आहे असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की माजी आमदार राहुल जगताप जर आमच्या बरोबर आले तर त्यांना विधान परिषदेसाठी आग्रही राहू त्यासाठी महाविकास आघाडीचा धर्म पाळून एकत्रित येऊन कुकडी कारखान्याला देखील आपण सर्वतोपरी मदत करू असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की जनतेने आता तरी सावध व्हावे आणि कुठल्याही भूलथापांना बळी न पडता सर्वांनी सौ अनुराधा नागवडे यांना यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे
यावेळी सुनंदाताई पाचपुते आपल्या भाषणात म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यात 2024 ला अनुराधाताई नागवडे यांच्या रूपाने मशाल पेटणार आहे नागवडे कुटुंबाकडे तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आहे सदाशिव अण्णां पाचपुते यांनी 2019 ला नागवडेंना शब्द दिला तो साजन भैय्याने पाळला साजन वर कमी वयात अण्णांचा वारसा चालवण्याची वेळ आली परंतु ती त्याने खंबीरपणे चालवली त्यातून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत साहेब यांनी देखील साजन ला शिवसेनेची जबाबदारी सोपवली ती तो प्रामाणिकपणे पार पाडत आहे तालुक्यातील आघाडीच्या नेत्यांनी देखील धर्म पाळावा चर्चेने मार्ग निघतो त्यासाठी एकत्रित येऊन सौ अनुराधाताई नागवडे यांचे मताधिक्य कसे वाढेल यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करूया निश्चितपणे अनुराधाताई नागवडे या आमदार होतील आम्ही देखील नागवडेंची दिलेल्या शब्दाप्रमाणे परतफेड करणार असल्याचे पाचपुते यांनी यावेळी बोलताना सांगितले
यावेळी जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यावेळी बोलताना म्हणाले की; महाविकास आघाडीने श्रीगोंद्यात उमेदवारी बाबत संधी देताना सर्वच महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील अनुराधाताई नागवडे यांना उमेदवारीसाठी साथ दिली. त्यामुळे तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी देखील आपले अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई नागवडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वांनी वज्रमुठ बांधावी असे आव्हान बाबासाहेब भोस यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
वाचक क्रमांक :