श्रीगोंदा विधानसभेसाठी भाजपाच्या सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By : Polticalface Team ,29-10-2024

श्रीगोंदा विधानसभेसाठी भाजपाच्या सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

श्रीगोंदा प्रतिनिधी/शफीक हवालदार : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार प्रतिभा बबनराव पाचपुते यांचा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ व आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांसह जाऊन साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल..

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांनी गेली ४० वर्ष प्रतिनिधित्व करत तालुक्याचा कायापालट केला आहे. तसेच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा निधी श्रीगोंदा तालुक्याला मिळवून दिला असल्याने या मतदारसंघात भाजपा च्या उमेदवार सौ.प्रतिभा बबनराव पाचपुते या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांनी श्रीगोंदा येथे केले.

श्रीगोंदा येथे विधानसभा मतदारसंघातील महायुतीची जागा भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते हे आजारी असल्याने त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. सोमवार दिनांक-२८/१०/२०२४ रोजी साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता पाच लोकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करायचा असे ठरले होते. परंतु हि बातमी तालुक्यात कळताच दादांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते सकाळीच माऊलीवर हजर झाले व भाजपाच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ व आमदार बबनराव पाचपुते व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी बोलताना चित्राताई वाघ म्हणाल्या कि नेत्यावर एवढे प्रेम करणारे कार्यकर्ते हिच नेत्यांची खरी संपती आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि विकी दादांच भाषण ऐकल्यानंतर मला दादांच्या जुन्या भाषणांची आठवण झाली. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, प्रतिभाताई पाचपुते, आमदार चित्राताई वाघ यांच्यासह लोकप्रिय नेते आमदार बबनरावजी पाचपुते यांनी उपस्थितीत जनसमुदायास संबोधित केले. यावेळी बोलताना दादा आजारी असल्यामुळे अनेक कार्यकर्ते भावूक झाले व अनेकांच्या डोळ्यातून बोलताना पाणी वाहू लागले. उपस्थितीत कार्यकर्त्यांनी विजयी होण्याची खात्री देत एकच वादा बबन दादा, विचार पक्का आमदार आक्का, देख लेना तुम आंखोसे जीत कर आयेंगे लाखोंसे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.