सौ अनुराधाताई नागवडे यांच्या निमगाव खलू येथील जन आशीर्वाद यात्रेस उदंड प्रतिसाद

By : Polticalface Team ,31-10-2024

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या निमगाव खलू येथील जन आशीर्वाद यात्रेस उदंड प्रतिसाद

     लिंपणगाव ( प्रतिनिधी )-श्रीगोंदा-नगर मतदार संघात आयोजित जन-आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांनी मौजे.निमगांव खलू येथे भेट  दिली तसेच उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. सोबत  स्थानिक समस्या व अडचणी समजून घेतल्या. 

यावेळी मतदारांशी संवाद साधताना सौ नागवडे पुढे म्हणाल्या की; येणारी विधानसभा निवडणूक ही आपल्या मतदारसंघाचे भविष्य ठरवणारी आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापाला बळी न पडता आपल्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या मतदारसंघाचे भविष्य सुरक्षित करूया आणि विकासाला न विचारणा देऊया, असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले. सौ नागवडे आणखी पुढे म्हणाल्या की श्रीगोंदा तालुक्यात विद्यमान लोकप्रतिनिधींनी सत्तेतून स्वतःची संपत्ती मिळवली प्रत्येक विधानसभा निवडणुकीत एमआयडीसीची घोषणा करून प्रत्यक्षात मात्र कुठलेही विकासाचे भरीव  काम झालेले नाही. फक्त मते मिळवण्यासाठी तरुणांना अमिष दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र काहीच कारवाई केली जात नाही.  त्यामुळे तरुणांना देखील रोजगार उपलब्ध होत नाही अनेक तरुण बेरोजगार आहेत चाळीस वर्षात एकही विकासाचे भरीव काम लोकप्रतिनिधींकडून झालेले नाही असे सांगून सौ नागवडे आणखी पुढे म्हणाल्या की; तालुक्याची कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असून सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही त्यामध्ये अनेक मुलींचे अपहरण होत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील अतिशय गंभीर बनला आहे या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी विधानसभेत हक्काचे आमदार म्हणून आम्हाला आशीर्वाद द्यावेत निश्चितपणे तालुका वैभव शाली करू असे आश्वासन अनुराधाताई नागवडे यांनी निमगाव खलू येथील ग्रामस्थांना दिले.

यावेळी विठ्ठल तात्या बोत्रे, रमेश नाना जाधव, युवराज अण्णा चितळकर, रामदास झेंडे, संतोष बारगळ, वाल्मिकी कातोरे, बाळासाहेब बोत्रे, सुदेश बारगळ, मोहनराव जाधव, सतीश बारगळ, संजय चितळकर, माधुरी नागवडे, शितलताई रंधवे, ज्ञानदेव जाधव, रमेश रुपनर, सुरेश ढगे, कल्याण गुणवरे, भाऊसाहेब शेवाळे, पोपट बोत्रे, क्रांतीलाल गुणवरे, ज्ञानदेव जाधव, मारुती शिंदे, अशोक कोळसे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष