विधानसभा निवडणुकीत सौ अनुराधाताई नागवडे ह्या मताधिक्याचीं मोठी हॅट्रेटिक करणार , तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठाम विश्वास

By : Polticalface Team ,01-11-2024

विधानसभा निवडणुकीत सौ अनुराधाताई नागवडे ह्या मताधिक्याचीं मोठी हॅट्रेटिक करणार   ,   तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठाम विश्वास

   लिंपणगाव (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अभ्यासू व मातब्बर घराणे म्हणून संबोधले जाणारे नागवडे कुटुंबाने सत्ता नसतानाही श्रीगोंदा तालुका सर्व क्षेत्रात विकासाच्या पर्वावर पोहोचविला. त्यामुळे नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई नागवडे ह्या विक्रमी मताची अट्रेटिक करणार असल्याच्या भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. प्रामुख्याने श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार व शिक्षण महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी आपले राजकारणाबरोबरच समाजकारणात भरीव योगदान देत असताना सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला मोठे वैभव मिळून दिले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी ढोकराईच्या माळरानावर बेलवंडी येथील खाजगी कारखाना सहकारी तत्त्वावर उभारला आणि खऱ्या अर्थाने तेथूनच पुढे श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाला मोठी गती आली. या दुष्काळी तालुक्याला योगदान देत असताना सहकार महर्षी बापूंनी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. परंतु माझ्या तालुक्यातला कष्टकरी शेतकरी सुखी झाला पाहिजे त्याच्या शेतीला पाठ पाण्याची सोय व्हावी म्हणून सहकार महर्षी बापूंनी प्रथम विशाल कुकडी परिषदेचा लढा उभारून या दुष्काळी तालुक्याला कुकडीचे पाणी मिळवून दिले. आजही कष्टकरी शेतकरी हे कुकडीच्या पाट पाण्यासाठी बापूंच्या संघर्षाची आठवण करून देतात. सहकार महर्षी बापूंचीच कृपावृष्टी असल्याचे आवर्जून सांगतात. शिवाय तालुक्याची सत्ता नसतानाही नागवडे कुटुंबाने समाजाच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष केला. या कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नानंतर तालुक्यात घोड धरणाचे पाणी देखील बापूंच्या संघर्षातूनच शेतकऱ्यांना मिळाले. हे कोणीही नाकारू शकत नाही. 

    सहकार महर्षी बापूंनी तालुक्यात सहकार सिंचन शिक्षण आणि कृषी क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आणि तोच वारसा बापूंचे पुत्र नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे; दीपक शेठ नागवडे हे सक्षमपणे पुढे चालवत आहेत. त्यामुळे ज्या नागवडे कुटुंबाने या दुष्काळी तालुक्याला सर्वच क्षेत्रात वैभव मिळून दिले मग नागवडे कुटुंबातील आमदार का होऊ नये? तालुक्यातील प्रत्येक वेळी अस्मानी संकटात नागवडे कुटुंबच सर्वसामान्यांच्या सुखदुःखात अग्रभागी असते. काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार  इतर नेते मात्र संकटप्रसंगी सर्वसामान्यांकडे पाठ फिरवतात निवडणूक आली की तेच  नेते व कार्यकर्ते मते मागतात. त्यांना मते मागण्याचा देखील नैतिक अधिकार नाही. असा सवाल देखील पत्रकारांशी बोलताना कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले आहे. आता इतर जे उमेदवार आहेत त्यांना मात्र कोरोना काळ पाठ पाण्याचा प्रश्न सर्वसामान्यांचा संकट काळ आठवत नाही हे देखील मोठी शोकांतिका आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा काळ हा संपूर्ण जगाला तीव्र दुःख देऊन गेला. त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे या बळी गेले. त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील देखील अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील व्यक्तींना या कोरोनाने बळी गेले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र या काळात कुठेच फिरताना दिसले नाही. मात्र नागवडे कुटुंबातील राजेंद्र दादा नागवडे व अनुराधाताई नागवडे यांनी श्रीगोंद्यात भव्य असे कोरोना सेंटर उभारून गरजू पीडित रुग्णांना उपचार मिळवून दिले. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. हे आपण जाणून घेतले पाहिजे. अशा भावना देखील तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. एवढ्यावरच हे नागवडे कुटुंब थांबले नाही तर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला कोरोनाच्या काळामध्ये दहा हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. इतर उमेदवार व नेत्यांना का बर आठवले नाही. हे देखील जनतेने जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे नागवडे कुटुंबाचे तालुक्यात सर्व क्षेत्रात भरीव योगदान असताना आता तालुक्यातील तमाम जनतेने देखील या नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहिले पाहिजे. विधानसभेला सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या सुनबाई सौ अनुराधाताई नागवडे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभ्या आहेत. सौ नागवडे यांनी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी बचत गटामार्फत मोठे आर्थिक पाठबळ देखील दिलेले आहे त्यामुळे महिला वर्गांचा देखील अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. सहकार महर्षी बापूंचा वारसा खंबीरपणे चालवत असताना सर्वसामान्यांना अधिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. या नागवडे परिवाराने बापूंच्या विकासाची संकल्पना पुढे देत खंबीरपणे वारसा पुढे चालवला आहे. त्यामध्ये सौअनुराधाताई नागवडे या अग्रक्रमाने पुढे आहेत. नगर -श्रीगोंदा मतदार संघात प्रत्येक खेडोपाडी जाऊन अनुराधाताई नागवडे व त्यांच्या परिवाराने सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये अनेक समस्या सोडवल्या. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये नागवडे कुटुंबांविषयी मोठा आदर व विश्वास या मतदारसंघात निर्माण झाल्याच्या भावना देखील सर्वसामान्यांमधून व्यक्त होताना दिसत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहकार महर्षी बापूंनी स्वतःला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळत असताना देखील बापूंनी ती नाकारली आणि राहुल जगताप यांच्यासाठी बापूंनी शिफारस केली. त्यावेळी याच नागवडे परिवाराने संपूर्ण श्रीगोंदा तालुका राहुल जगताप यांना निवडून द्या; यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. आज मात्र हे चित्र तालुक्यात वेगळे होताना दिसत आहे. राहुल जगताप यांनी पाठीमागे दहा वर्षाचा इतिहास तपासून नागवडे यांना आगामी 2024 च्या निवडणुकीत पाठिंबा देऊन परत फेड करण्याची आवश्यकता आहे. असा सूर देखील संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे. परंतु श्रीगोंदा तालुक्यातील विकासात नागवडे कुटुंबाचे असलेले योगदान तालुक्यातील जनता कदापि ही विसरणार नाही. अशा प्रतिक्रिया देखील सर्वसामान्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. नागवडे कुटुंबातील सौ अनुराधाताई नागवडे या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तालुक्यातील मतदारांचा निवडणूक सर्वे देखील समोर आला आहे. त्यामध्ये अनुराधाताई नागवडे यांना प्रथम क्रमांकाची पसंती असल्याचा कौल मिळाला आहे. त्यामुळे निवडणूक सर्वे म्हणजे एक नागवडे कुटुंबाचा हा श्रीगोंदा तालुक्यातील विकासाचा व सर्वसामान्यांच्या हिताचा पर्वकाळ ठरणार आहे.  तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांमधून देखील अनुराधाताई नागवडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे वाढेल; यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तालुक्याचा विकास हवा तर आमदार नवा अशा भावना निर्माण करताना दिसत आहेत. त्यामध्ये सौ अनुराधाताई नागवडे यांच्या जन आशीर्वाद यात्रेस देखील तालुक्यातील नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील जनतेने उदंड असा प्रतिसाद नागवडे कुटुंबावर व्यक्त केला असल्याचे या जन आशीर्वाद यात्रेवरून दिसून येत आहे. या नागवडे कुटुंबाच्या तालुक्यातील सर्वांगीण भरीव विकासाच्या आधारावर अनुराधाताई नागवडे याच 2024 च्या आमदार असणार असल्याच्या भावना देखील कार्यकर्त्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष