महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय
By : Polticalface Team ,09-11-2024
जनआधार न्युज 24तास भिमसेन जाधव,
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अनेक दशकापासून होती. परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसने दिला नाही. आता काँग्रेसला धक्का बसला आहे. मोदी यांनी हे काम कसे केले, हा प्रश्न त्यांना पडला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सांगितले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पहिली सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन नुकतेच मी केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी काही बोललो नाही. परंतु आता ज्या दिवशी महायुती सरकारचा शपथविधी होईल, त्यानंतर राज्यसरकारसोबत आम्ही बैठक घेऊ. त्या बैठकीत वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले
*महाविकास आघाडीकडे चालकच नाही…*
महाविकास आघाडीच्या गाडीत चाके नाही, ब्रेक नाही. तसेच चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात आधी सरकारला लुटले. त्यानंतर विकास कामे थांबवली. त्यांनी मेट्रोची काम रोखली. समृद्धी महामार्गाचे काम थांबवले. त्यांनी महाराष्ट्रातील विकासाची प्रत्येक योजना थांबवली. त्यानंतर राज्यात महायुतीची सरकार बनली. त्यानंतर अडीच वर्षांत विकास चौफर झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास भरभरुन झाला आहे. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
*महिलांना जास्त अधिकार दिले*
महायुतीने वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या दहा वचनांची चर्चा होत आहे. जनतेच्या सूचनांमधून हा वचननामा तयार झाला आहे. महायुतीचा वचननामा विकसित भारताचा आधार बनणार आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी आमच्या बहिणींचे जीवन चांगले बनवणे गरजेचे आहे. महिला पुढे जातील तर संपूर्ण समाज प्रगती करेल. त्यामुळे मागील दहा वर्षांत केंद्र सरकारने महिलांना केंद्रात ठेऊन काम केले. महिलांसाठी आम्ही सर्व दरवाजे उघडले. त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्राची महायुती सरकार केंद्राच्या पावलापाऊल ठेवून काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात होत आहे. काँग्रेस ही योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते कोर्टात पोहचले आहे. त्यांची सत्ता आली तर सर्वप्रथम ही योजना ते बंद करतील? असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.