माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार
By : Polticalface Team ,09-11-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.८/११/२०२४
श्रीगोंदा विधानसभेचा उमेदवारीअर्ज मागे घेतल्यानंतर घनशाम शेलार यांनी भूमिका स्पष्ट करत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले दि. ४ रोजी काँग्रेस पक्षाचे सक्षम नेतृत्व असलेले बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, रमेश चैनीथला यांचा निरोप आला आपण काँग्रेस पक्षाबरोबर थांबावं चांगल्या प्रकारची संधी दिली जाईल असा शब्द दिल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली.
२०१९ च्या विधानसभेच्या पराभवानंतर लगेच मतदार संघामध्ये सक्रिय झालो मागील पाच वर्षांमध्ये सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला श्रीगोंद्याची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे उमेदवारी अर्ज अपक्ष भरला परंतु कुठल्यातरी पक्षाचा आधार असावा, म्हणून बच्चुभाऊ कडू यांच्याशी बोलून प्रहार कडून अर्ज भरला परंतु या निर्णयामुळे काँग्रेस मधील कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली.
दरम्यान राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते यांचा मेळ घालून यांच्याजवळ एकत्र येण्याची भूमिका मांडली त्यांना यापुढे अनेक ठिकाणी संधी आहेत माझी ही शेवटची संधी होती परंतु या सर्व गोष्टींना यश आले नाही. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निरोप आल्याने काँग्रेस सोबत थांबून उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला असे घनशाम शेलार यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना शेलार म्हणाले राजकीय आयुष्यात कुठेही सेटलमेंट केली नाही कोणालाही मी मिंधा न राहता निर्णय घेतला आहे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तेवढी उंची नाही. सेटलमेंट केली असे म्हणणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. कार्यकर्त्यांशी बोलून महाविकास आघाडी साठी सोमवार पर्यंत भूमिका स्पष्ट करणार विधानसभेच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी मी भूमिका मांडल्यानंतर बोलू नये असही शेलार म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद कर सर, वलघुड - खांडगाव चे सरपंच राम घोडके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, बाळासाहेब शेलार, श्रीपाद दादा ख्रिस्ती, प्रकाश निंभोरे ,भिंनताडे साहेब, सुभाष दरेकर ,अमोल टकले, धनंजय औटी ,दिगंबर शिंदे ,संतोष कुदांडे ,संजय इंगळे ,मच्छिंद्र जाधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.