श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

By : Polticalface Team ,13-11-2024

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न लिंपणगाव ( प्रतिनिधी) दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले होते.सदर प्रशिक्षणास 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक मा.डी रत्ना मॅडम यांनी भेट दिली.यावेळी निरीक्षक मॅडम यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना निवडणूक कामकाजाबाबत *You should be systematic* हा दृष्टिकोन ठेऊन काम करावे ही सूचना केली.मा.निवडणूक आयोगाने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नये. प्रत्येक निवडणुक ही वेगळी असते त्यामुळे सर्वांनी हँडसऑन ट्रेनिंग तसेच प्रशिक्षणातील सर्व बाबीची काळजीपूर्वक माहिती घ्यावी अशी सूचना केली.या प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी शिर्डी मा.श्री.कोळेकर आणि अरुण कटाळे कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर यांनीही भेट दिली. यावेळी मा. कोळेकर साहेब यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी कराव्या लागणाऱ्या सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांनी टीम म्हणून काम करावे आणि मतदानाच्या दिवशी आवश्यक असणारे सर्व महत्त्वाचे नमुने यामध्ये नमुना 17 क, नमुना 17 अ, केंद्राध्यक्ष दैनंदिनी व्यवस्थित भरावी. मतदान केंद्रावर प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदान पथकातील सर्वांनी सर्व निवडणूक कामकाज समजून घेऊन केल्यास सर्व अधिकारी कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थितपणे पार पाडली जाते .यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन मधील सर्व बारीक-सारीक गोष्टींची इत्यंभूत माहिती सांगितली आणि ईव्हीएम मशीन मध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी 226 श्रीगोंदा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन 15 मा. गौरी सावंत तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार श्रीगोंदा डॉ.क्षितिजा वाघमारे, परिविक्षाधीन तहसीलदार प्रवीण मुदगुल, निवडणूक नायब तहसीलदार पंकज नेवसे उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.