महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
By : Polticalface Team ,15-11-2024
श्रीगोंदा - प्रतिनिधी
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातुन महविकास आघाडीचे उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांना विधान सभेत पाठवा.तालुक्यात विकास काय असतो ते महविकास आघाडी दाखवून देईल.तालुक्याचा घोड,कुकडी, व साकळाई पाणी योजना मार्गी लावू असे मत राज्याचे मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांच्या जाहीर प्रचार सभेत ठाकरे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,खा.फोजिया खान,शिव व्याख्याते शेख सुभान अली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की,अपक्ष उमेदवार जनतेशी गद्दारी करत आहेत. अनुराधाताईंचा विजय निश्चित आहे, मात्र आडकाठी करणारे गद्दार ठरणार.” ठाकरे यांनी पंधराशे रुपयांत महिलांना नोकरदार करणाऱ्या राजकारण्यांवर टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांचा देव नरेंद्र मोदी आहे, तर आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपले दैवत शिवराय असल्याने जय शिवराय हीच आपली घोषणा आहे,” अशा ठाम शब्दांत त्यांनी मतदारांना अनुराधाताई नागवडे यांना मतदान करण्यासंदर्भात आवाहन केले.
सभा सुरू झाल्यावर सामाजिक पदाधिकारी सुभान अली सह बाबासाहेब भोस, सुनंदा पाचपुते, घनश्याम शेलार, अनुराधाताई नागवडे यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
अनुराधा नागवडे यांनी आपल्या भाषणात श्रीगोंद्यातील सामान्य लोकांविषयी आपुलकी व्यक्त केली आणि प्रस्थापित राजकारण्यांवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले की, “श्रीगोंद्यातील सामान्य जनतेला तळहाताच्या फोडासारखं जपलं आहे, परंतु इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी मदतीसाठी दोनदा आमच्याकडे येऊनही कधीही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही.” याच संदर्भात त्यांनी अपक्ष उमेदवारांवरही टीका करत, “घनश्याम अण्णांनी आम्हाला मदत करून उपकृत केले, मात्र अपक्ष उमेदवारांमध्ये ती दानत नाही,” असे स्पष्ट केले.
नागवडेंनी आणखी सांगितले की, “चाळीस वर्षांपासून पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहे, आणि अजूनही त्याचे समाधान झालेले नाही. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची प्रशासनाकडून तपासणी केली जाते, तर दुसरीकडे पुलवामा सारख्या गंभीर मुद्द्यांची तपासणी एवढ्या तत्परतेने केली असती तर दुर्घटना टळली असती..”
शासनाच्या अपयशाचा उलगडा करत त्यांनी शेतकरी, महिलांची सुरक्षितता, आणि श्रीगोंद्याच्या व्यापारी राजकारणावर भाष्य केले. “शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. “श्रीगोंद्यात जिथे राजे व्यापारी झाले आहेत, तिथे जनता भिकारी होणारच,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. तसेच, तालुक्यातील प्रलंबित आणि मूलभूत प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था यांवर प्रकाश टाकला. “५० खोके/ओके.. या सरकारात भ्रष्टाचार झाला आहे. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे शासन हवे,” असे ते म्हणाले. थोरातांनी कुकडी कारखान्याचा इतिहास सांगत, “बापूंच्या संमतीमुळेच कुकडी कारखाना सुरू झाला,” असे नमूद केले.
यावेळी मिलिंद नार्वेकर, राजेंद्र नागवडे, शशिकांत गाडे, साजन पाचपुते, दीपक शेठ नागवडे, घनश्याम आण्णा शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल्स महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजपूरकर, सुनंदा पाचपुते, प्रशांत दरेकर, आदेश नागवडे, बाळासाहेब दुतारे, विजय शेंडे, बंडू तात्या जगताप, संतोष इथापे, भाऊसाहेब गोरे, बाळासाहेब दुतारे, संतोष खेतमाळीस, जहीर जकाते, शरद पवार, बाळासाहेब नलगे, निशांत लोखंडे,यांच्यासह कार्यकर्ते,पदाधिकारी व असंख्य महिला,पुरुष व तरुण उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.