विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
By : Polticalface Team ,15-11-2024
प्रतिनिधी / श्रीगोंदे :- भाजपने आर्थिक फसवणूकी शी संबंधित ३० गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे हा एक प्रकारे त्यांनी विक्रमच केला असून आता त्यांना कारवाईला संरक्षण आणि विकास कामात टक्केवारी घेण्याची लागलेली सवय अखंड राहावी म्हणून आमदार व्हायचे असल्याची टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांनी वाळकी येथील सभेत बोलताना केली.
वाळकी येथे प्रचार सभे प्रसंगी जगताप बोलत होते.
अध्यक्षस्थानी संभाजी कासार होते.
जगताप म्हणाले भाजप उमेदवाराने गेल्या अडीच वर्षात टक्केवारी घेतल्याने कामाचा दर्जा घसरला काही कामे तर शुभारंभ करून बंद पडली त्यामागे देखील टक्केवारी हेच कारण आहे .महाविकास आघाडी उमेदवारावर टीका करताना जगताप म्हणाले त्यांनी माझी उमेदवारी डावलण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाला पण मला तुम्हा जनतेने आग्रह करून उमेदवारी करण्यास बळ दिले.
महा विकास आघाडी उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांना मतदार संघ माहित नाही मतदार संघातील हात वळण ऐवजी त्या पोहोचल्या बीड जिल्ह्यातील हात वळण् येथे त्यानंतर तरी त्यांनी चूक दुरुस्त करावयास हवी होती पण पश्चिम भागात असलेल्या वडगाव येथे पोहोचण्या ऐवजी त्या पोहोचल्या शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे तेथे भाषणे सुरू झाली मशाल चिन्हा ला मते द्या अस कार्यकर्ते म्हणाले लोक म्हणाले येथे तुतारी विरुध्द घड्याळ आहे मग निघून आले.असे सांगून जगताप म्हणाले महा विकास आघाडी आणि भाजप हे दोन्ही उमेदवार पुण्याला राहतात यांना मतदार संघाचे देणे घेणे नाही .माझ्यावर भाजप चा डमी उमेदवार असल्याची तसेच ३० कोटीचा आरोप होतो पण मी लोकसभा निवडणूक पुर्वी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मला कारखान्यासाठी १३८ कोटी रुपये देत होते मी तिकडे गेलो नाही त्यामुळे माझ्यावरील आरोप निराधार आहे खासदार शरद पवार यांच्या वर निष्ठा ठेवली मला उमेदवारी मिळाली नाही पण शरद पवारांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवत असून शरद पवार यांचे सर्व उमेदवार तुतारी चिन्हावर तर मी एकमेव रोडरोलर चिन्हावर निवडणूक लढवत आहे.
यावेळी, स्मितल वाबळे , संभाजी कासार,निमसे,पाटील,अतुल लोखंडे टिळक भोस,अनिल ठवाळ , हरिदास शिर्के श्याम जरे प्रकाश पोटे राजेंद्र परकाळे राजेंद्र मस्के आदींची भाषणे झाली.
माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, स्मितल भैय्या वाबळे, माजी सरपंच दानिश सय्यद,पांडुरंग पोटे, सकलेन शेख,नितीन डुबल , बाळासाहेब उगले , आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रारंभी फुलांचा वर्षाव करून राहुल जगताप यांचे स्वागत करण्यात आले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.