श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

By : Polticalface Team ,16-11-2024

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर लिंपणगाव प्रतिनिधी: गेली चाळीस वर्षे श्रीगोंदा तालुक्याने बबनराव पाचपुते यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. त्यातून ते मंत्री, पालकमंत्री झाले. पण त्यांच्याकडून स्वांताच्या गावचा विकास त्यांना करता आला नाही तर त्यांचा मुलगा काय दिवे लावणार त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. आमदाराचा मुलगा आमदार आम्ही करणार नाही. तर या विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज हा महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधाताई नागवडे यांच्या सोबत राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार असल्याची ग्वाही काष्टी येथील स्वामी समर्थ संस्थेचे संस्थापक व नागवडे कारखान्याचे माजी संचालक आबासाहेब कोल्हटकर यांनी बोलताना सांगितले. श्रीगोंदा तालुक्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी चालू असताना महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ धनगर समाजाचे पदाधिकारी गावोगावी फिरुण नागवडे यांच्या मशालीचा घर टु घर प्रचार करित आहेत. यावेळी बोलताना कोल्हटकर म्हणाले आम्ही अनेक वर्षे आमदार पाचपुते यांच्या सोबत राहिलो परंतु त्यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी नाही. अनेक वर्षे त्यांच्या कडे महत्वाचे मंत्रीपदे होती.पालकमंत्री होते.पण तरुणांना रोजगार देता आला नाही. तालुक्यात फिरताना सामान्य जनतेला त्यांनी फक्त विकासाची आश्वासने दिली.परंतु विकास मात्र कागदावर राहिला. समाजाची प्रश्न कधी समजुन गेले नाही. सोडविले नाही.स्वांताच्या गावात आम्हाला वाडीवस्तीवर रस्ते, पाणी,लाईटची सोय नाही. प्रत्येक निवडणूक आली फक्त आश्वासन द्यायचे खोटे बोलाचे एवढच काम त्यांनी केले.आणि आता मुलगा विक्रमला उमेदवारी दिली. साडे चार वर्षे तो कधी मतदार संघात नसतो. निवडणूक जवळ आली कि सक्रिय होतो. पण अशा ढोगी लबाडांना जनता आता थारा देणार नाही.गावच्या ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार पुत्र प्रतापसिंह चा पराभव करुण परिवर्तनाची सुरुवात केली आहे. आता तालुक्यात अनुराधा नागवडे यांच्या परिवर्तन घडवायचे आहे. म्हणून आम्ही सर्व धनगर समाज बांधव एकत्र येवून नागवडे यांच्या प्रचासाठी फिरत आहे.असे कोल्हटकर म्हणाले.यावेळी तालुक्यातील धनगर समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी