श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

By : Polticalface Team ,17-11-2024

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

लिंपणगाव प्रतिनिधी :

श्रीगोंदा तालुक्याच्या जडण घडणीत दिवंगत आमदार शिवाजीराव नागवडे व त्यांच्या कुटूंबियांचे सर्वाधिक  योगदान असून,आमदारकीवर सर्वात जास्त नैतिक अधिकार नागवडे कुटूंबियांचाच आहे असे प्रतिपादन श्रीगोंदा वकील संघाचे माजी अध्यक्ष व श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक ऍड.सुनील कांतीलाल भोस यांनी केले आहे.

ऍड.भोस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. बॅलेट मशीनवर जसे सर्वात प्रथम नाव सौ.अनुराधा राजेंद्र नागवडे यांचे आहे हा एक शुभ शकुन आहे की निकालात देखील सौ.नागवडे यांचा क्रमदेखील सर्वात वर असणार आहे.कै. शिवाजीराव बापू नागवडे यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणली.सुमारे पाऊण शतक त्यांनी अहोरात्र विकासकामे केली.त्यांच्या पराकाष्ठेमुळे सध्या तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे.बापुंच्या स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी आता त्यांच्या स्नुषा सौ.अनुराधा वहिनी निवडणुकीस उभ्या आहेत.त्यांना आमदार करून श्रीगोंदा तालुका राज्याच्या नकाशात उच्चस्थानी नेण्याची अपूर्व संधी चालून आली आहे.

बहुरंगी लढतीत सर्वाधिक मेरिट असणारे उमेदवार म्हणून सौ.नागवडे यांच्याकडे जनता आशेने पाहत आहे.त्यांना आमदार करण्यात तालुक्यातील प्रत्येक लहान-मोठ्या घटकांचा हातभार लागत आहे.

नागवडे कुटूंबियांची खासियत म्हणजे त्यांनी आजवर सदैव दिलेला शब्द पाळलेला आहे.मविआच्या जाहीरनाम्यात व शिवसेना(उबाठा)च्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करण्याचे काम सौ.नागवडे या करतील.२०१४ साली कै. बापू यांनी केलेल्या त्यागामुळेच तालुक्यात सत्ताबदल झाला.बापूंच्या त्यागातून ज्यांनी आमदारकी मिळवली त्यांना पुढे सत्तेची ऊब लागल्यावर या त्यागाचा विसर पडला.कुकडी साखर कारखान्याची उभारणी व २०१४ ला मिळालेली आमदारकी यात नागवडे कुटूंबियांचे लाख मोलाचे योगदान आहे.त्याची उतराई करण्याची संधी अपक्ष उमेदवाराला आली होती.मात्र उतराई न करता नागवडेंना आडकाठी करण्यात त्यांनी धन्यता मानली.त्यांच्या या कृतीची तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.मतपेटीतून जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.सर्व बाबीचा  साकल्याने विचार करता सौ नागवडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा दावा ऍड.भोस यांनी पत्रकात केला आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.