By : Polticalface Team ,25-11-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- चालू वर्षाच्या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने नागवडे कारखाना सरासरी प्रमाणे ऊस भावात मागे राहणार नाही अशी ग्वाही नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी आयोजित नागवडे कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ प्रसंगी बोलताना दिली.
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचा सन 2024- 25 50 व्या सुवर्ण महोत्सवी गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन समारंभ नागवडे कारखान्याचे संचालक भाऊसाहेब नेटके; सावता हिरवे; बंडू जगताप; विठ्ठल जंगले व त्यांच्या सुविध्य पत्नींच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यावेळी म्हणाले की; सहकार महर्षी दिवंगत कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव नागवडे बापू यांनी ही सहकार चळवळ मोठ्या संघर्षातून उभी केली आहे त्यामुळेच शेतकरी कष्टकरी यांचे प्रपंच फुलले या सहकार चळवळीमुळेच आम सभासद; ऊस उत्पादक कामगारांना देखील उज्वल भविष्य प्राप्त झाले आहे. सहकार महर्षी बापूंनी ही सहकार चळवळ काटकसरीने कारभार करून सहकार क्षेत्रात राज्यात आदर्शव्रत असे काम केले. सहकार महर्षी बापूंचे संस्कार व विचार डोळ्यासमोर ठेवून नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व संचालक मंडळ सभासद योग्य असे निर्णय घेत आहेत. असे सांगून श्री भोस आणखी पुढे म्हणाले की; सभासद; ऊस उत्पादकांनी देखील आपलीच कामधेनू समजून नागवडे कारखान्याला ऊस दिला पाहिजे सहकारी साखर कारखानदारी पुढे खाजगी कारखानदारांचे मोठे आव्हान उभे आहे. असे सांगून श्री भोस आणखी पुढे म्हणाले की; हिरडगावच्या गौरी शुगरने टनाप्रमाणे ऊस उत्पादकांना साखर वाटप केली. परंतु नागवडे कारखान्याने देखील मयत सभासद व ऊस नसताना देखील केवळ सभासद म्हणून दीपावलीसाठी साखर वाटप केलेली आहे. हे लक्षात घ्यावे नागवडे कारखान्याने देखील सभासदांचेच हित जोपासण्याचे काम केले आहे. असे सांगून श्री भोस आणखी पुढे म्हणाले की; गाळप हंगामात खाजगी कारखाने हे ऊस उत्पादक ऊसतोड मजुरांना चढ्या भावाचे अमिष दाखवतात. त्याला ऊस उत्पादक सभासद हे बळी पडतात. बाहेरील कारखान्यांना ऊस देतात त्यामुळे त्याचा गाळप हंगामावर मोठा दुष्परिणाम होतो. रिकवरीनुसार नागवडे कारखान्याने वेळोवेळी ऊसउत्पादकांना योग्य भाव दिलेला आहे. त्यामुळे इतर कारखान्यांना ऊस न देता तो चालू वर्षी नागवडे कारखान्यालाच गाळप हंगामात ऊस द्यावा; असे आवाहन श्री भोस यांनी यावेळी केले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यावेळी म्हणाले की; अलीकडे साखर धंद्यात प्रचंड स्पर्धा वाढवली जाते. या स्पर्धेमुळे दुर्दैवाने अनेक कारखाने बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखान्याला संघर्ष करावा लागतो. खाजगी कारखान्यांना शासनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु सहकारी साखर कारखान्यांपुढे शासनाचे अनेक निर्बंध आहेत. त्यातूनच सहकारी साखर कारखान्यांना वाटचाल करावी लागते. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणले की; जेवढे जास्त गाळप होईल त्यानुसार ऊस भाव दिला जातो. हा सहकाराचा नियम आहे. त्यामुळे ऊस भाव व ऊस वाहतूक खर्च इतरांप्रमाणे मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ऊस उत्पादक व ऊसतोड मजुरांची वाढली जाते. परंतु पूर्वी पाच ते सहा महिने साखर कारखाने गाळप करत होते. आता ही परिस्थिती राहिलेली नाही. फक्त तीन महिनेच कारखाने चालतात. त्यामुळे सहकारी साखर कारखाने सर्वांगाने अडचणीत येतात. असे सांगून श्री नागवडे आणखी पुढे म्हणाले की; तरी देखील नागवडे कारखान्याने ऊस उत्पादकांच्या अडचणी प्रसंगी ऊस उत्पादक सभासदांना आर्थिक मदत करत आहे. कारखान्याचे क्रॉसिंग साडेसहा हजार कशा पद्धतीने होईल यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की; काल पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी गाळप झालेल्या ऊस उत्पादकांना मागील गाळपाचे पैसे वेळेत न देता मतदारांना पैशाची उधळपट्टी केलेली दिसली. हे विदारक चित्र सध्या निर्माण झालेले आहे. भविष्यकाळात सहकार वाचवायचा असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. सहकार महर्षी बापूंच्या विचार व संस्कारातूनच नागवडे कारखान्याची सध्या घौडधोड सुरू आहे.
असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की; चालू वर्षी नागवडे कारखान्याने जास्तीत जास्त ऊस तोडणीचे योग्य असे नियोजन केलेले आहे. कारखान्याने सहा ते सात हार्वेस्टर घेतलेले आहे. त्यामुळे ऊस तोडणी बाबत कुणीही शंका उपलब्ध करू नये. यासाठी सभासद ऊस उत्पादक व कामगारांची गाळप हंगामात जबाबदारी असणार आहे. सहकारापेक्षा खाजगीचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु खाजगीवाले हे खाजगीच्या पद्धतीनेच कारभार करतील. परंतु सहकाराला शासनाच्या चौकटीत राहूनच कारभार करावा लागतो. साखरेचे भाव वाढविण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी समोर मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे सर्वांनीच सहकारावर विश्वास ठेवावा. जिल्ह्यातील इतर कारखान्यांप्रमाणेच सरासरी प्रमाणे नागवडे कारखाना चालू गळीत हंगामात ऊस भाव देण्यात मागे राहणार नाही. असे सांगून नागवडे आणखी पुढे म्हणाले की; कारखान्याचे सभासद हे मोठ्या प्रमाणावर असताना देखील सात ते आठ हजारच सभासद हे कारखान्याला ऊस देतात. परंतु त्यांना देखील दुजाभाव न करता सभासद असल्याने साखर वाटप केलेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व सभासदांनी बाहेर ऊस न देता नागवडे कारखान्याला द्यावा; असे आवाहन श्री नागवडे यांनी यावेळी बोलताना केले.
व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे; शिवसेनेचे नेते संतोष खेतमाळीस; माजी संचालक विलासराव काकडे; एडवोकेट अशोक रोडे; अर्जुन मचाले प्रशांत गोरे; विठ्ठल वाळुंज; रमेश गायकवाड; कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक; कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे; सर्व नगरसेवक; सभासद; कामगार; ऊस उत्पादक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले. तर आभार संचालक शरद जगताप यांनी मानले.
वाचक क्रमांक :