लिंपणगाव चा युवक आदित्य लष्करे याचे संगमनेर जवळ अपघातात दुर्दैवी निधन तर शुभम लष्करे गंभीर जखमी

By : Polticalface Team ,27-11-2024

लिंपणगाव चा युवक आदित्य लष्करे याचे संगमनेर जवळ अपघातात दुर्दैवी निधन तर शुभम लष्करे गंभीर जखमी

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील युवक कार्यकर्ते पंडितराव लष्करे यांचे चिरंजीव आदित्य पंडित लष्करे वय 25 याचे नुकतेच संगमनेर जवळ अपघातात दुर्दैवी निधन झाले. 


    मिळालेल्या माहितीनुसार आदित्य लष्करे हे व शुभम लष्करे हे दोघेजण संगमनेर येथे लग्न सोहळ्यासाठी लिंपणगावहून संगमनेर कडे स्वतःच्या स्कुटीवर जात असताना जांभळवाडी शिवारात साकुर लळाई घाटात ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे समोरून ट्रकने धडक दिल्याने आदित्य लष्करे हे जागीच ठार झाले; तर युवक शुभम लष्करे हे गंभीर जखमी झाले असून; त्याचे पायाचे हाड मोडले आहे त्यात त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर दौंड येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ही दुर्दैवी अपघाताची घटना लिंपणगावमध्ये कळताच संपूर्ण लिंपणगाव पंचक्रोशीत युवक आदित्य लष्करे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची घारगाव तालुका संगमनेर येथील पोलिसात फिर्याद दाखल झालेली असून; मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी विरुद्ध गुन्हा रजि. नंबर 410/२०२४ नुसार पुढील तपास दत्तात्रेय माधव चौधरी हे करीत आहेत


दरम्यान अपघातातील मृत युवक आदित्य लष्करे याचा नुकताच लग्न साखरपुडा झालेला होता. विवाह बंधनात जाण्या अगोदरच आदित्य लष्करे याचे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना अति तीव्र दुःख झाले आहे. आदित्य  हे अत्यंत मनमिळावू हुशार आणि सर्वांशी हसतमुख असणारे व्यक्तिमत्व होते काही महिन्यानंतर त्याचा शुभविवाह होणार होता परंतु काळाने आदित्य याच्यावर घाला घालून लष्करे परिवारासह लिंपणगाव पंचक्रोशीतील मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघात ग्रस्त आदित्य याच्यावर संगमनेर येथे शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन करून आदित्यचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आदित्यच्या निधनाने त्याचे वडील पंडित लष्करे व त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यविधी प्रसंगी मोठा हंबरड फोडला लिंपणगाव येथील स्मशान भूमीत आदित्य वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्याचे वडील पंडित लष्करे यांनी अग्नी दिला आदित्य लष्करे हे ग्रामपंचायत सदस्य शामराव लष्करे यांचे पुतणे होत. अंत्यविधी समयी लिंपणगाव पंचक्रोशीसह आदित्यचा मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. आदित्यला सर्वांनीच अश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.



वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.