By : Polticalface Team ,09-12-2024
श्रीरामपूर (प्रतिनिधी) - विधान भवनामध्ये सुरू असलेल्या आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमात श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार हेमंत ओगले यांनी शपथ ग्रहण करतानाच श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीची टोपी घालून सभागृहासह राज्याचे लक्ष वेधून घेतले व भविष्यामध्ये आपण मतदार संघासाठी करणार असलेल्या कामाचा श्री गणेशा केला.
काल सकाळी 11 वाजून 36 मिनिटांनी शपथ ग्रहणासाठी हेमंत ओगले यांचे नाव पिठासन अधिकारी कालिदास कोळंबकर यांनी पुकारताच शपथ घेण्यासाठी आमदार हेमंत ओगले हे डोक्यावर गांधी टोपी घालून व्यासपीठावर आले.टोपीवर श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे असे घोषवाक्य दोन्ही बाजूने लिहिलेले होते.सोबत संविधानाची प्रत देखील त्यांनी आणली होती.श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी करत त्यांनी आमदारकीची शपथ घेतली.त्यांच्या टोपीने संपूर्ण सभागृहाचे तसेच टीव्हीवर शपथ ग्रहण समारंभ पाहणाऱ्या राज्यभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.
१९९३ साली सोनई येथे झालेल्या सभेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा केली होती.त्यानंतर सर्व श्रीरामपूरकर हे आपल्या जिल्ह्याचे स्वप्न साकारण्याची वाट पाहत आहेत.मागील ४० वर्षात या प्रश्नावर अनेक वेळा राजकारण झाले.श्रीरामपूरचे नेते माजी मंत्री कै.गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर जिल्ह्याची पायाभरणी भक्कमपणे करून ठेवली आहे.माजी आमदार जयंत ससाणे यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरघोस योगदान दिले. परंतु हे दोन्ही नेते निघून गेल्यानंतर या प्रश्नाची धार थोडी कमी झाल्यासारखे वाटले. त्यातच शेजारील राहत्याचे राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री,महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे नेले.त्यासाठी इमारतीचे काम देखील सुरू झाले आहे. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा होणार की नाही याबद्दल आता साशंकता निर्माण झालेली असताना श्रीरामपूरचे नूतन आमदार हेमंत ओगले यांनी काल अचानकपणे विधान भवनामध्ये आमदार शपथविधी कार्यक्रमांमध्ये श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे हे वाक्य लिहिलेली गांधी टोपी परिधान करून आपल्या आमदारकीची शपथ घेतली व श्रीरामपूरच्या विकासासाठी आपण पहिल्या दिवसापासून कटिबद्ध आहोत असा संदेश तालुक्याला व राज्याला दिला. आमदार हेमंत ओगले यांच्या या कृतीने संपूर्ण श्रीरामपूर मतदारसंघातील मतदार सुखावले आहेत आणि आपला निर्णय योग्य आहे.आपण योग्य माणसाची निवड केली असा आशावाद त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आंदोलने सुरू आहेत.परंतु या आंदोलनामध्ये पाहिजे तेवढा दम नाही. दोन गटांकडून हे आंदोलने होत असल्याने आणि त्यातही राजकारण अधिक दिसत असल्याने त्याला सर्व श्रीरामपूरकरांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.मात्र आता आमदार हेमंत ओगले यांनी या प्रश्नाला चालना दिली आहे.
श्रीरामपूर जिल्ह्यासाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये तत्कालीन लोकप्रतिनिधी माजी आमदार लहू कानडे यांचा सक्रिय सहभाग नव्हता. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत कायदेशीर मार्गाने आवाज उठवला खरा. परंतु जन आंदोलनामध्ये ते सक्रिय नव्हते. त्याबरोबरच गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधाताई आदिक व सुपुत्र अविनाश आदिक हे देखील या आंदोलनामध्ये फारसे सक्रिय झाले नाहीत.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय नेल्याने त्यांचे भाजपचे तालुक्यातील कार्यकर्ते देखील फार मनाने आंदोलनात नाहीत. हे सर्व पाहता श्रीरामपूर जिल्ह्याचे स्वप्न साकार होणार का नाही असा प्रश्न प्रत्येक श्रीरामपूरकर विचारीत आहे.परंतु आमदार हेमंत ओगले यांनी काल विधान भवनामध्ये या प्रश्नाला अनोख्या पद्धतीने वाचा फोडली. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपूर जिल्हा होणार ही आशा पल्लवीत झाली आहे.
श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी मतदारसंघातील सर्वांनी आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जोरदार आंदोलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार हेमंत ओगले यांनीच पुढाकार घ्यावा व त्यांच्या नेतृत्वाखालीच हे आंदोलन उभे राहावे. त्यासाठी तालुक्यातील व शेजारच्या तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना साथ द्यावी अशी आशा आणि अपेक्षा श्रीरामपूरकर व्यक्त करीत आहेत.
श्रीरामपूरच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य घ्या
आमदार हेमंत ओगले हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. सध्या काँग्रेस पक्षाचे राज्यभरातून फार कमी आमदार निवडून आलेले आहेत.विरोधी पक्षाचे आमदार असल्याने शासनाकडून निधी मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी पाच वर्षात श्रीरामपूरसाठी तीन हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिलेले आहे.हा निधी प्राप्त करण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींची गरज भासणार आहे. तसेच महायुतीतील शिंदे सेना व भाजपाच्या नेत्यांची देखील आवश्यकता भासणार आहे. श्रीरामपूरच्या विकासासाठी आमदार ओगले यांनी पक्षीय निवेश बाजूला ठेवून तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास करावा अशी अपेक्षा श्रीरामपूर मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
माजी आमदार जयंत ससाणे यांनी तालुक्यात काम करताना निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण हे तत्व स्वीकारित सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांचे सहकार्य घेत आपली वाटचाल यशस्वी केली होती.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आमदार ओगले यांनी देखील राज्य शासनातील जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य घेऊन तालुक्याचा विकास करावा.श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणावेत. तरुणाईला रोजगार उपलब्ध करण्यासाठी तालुक्यात नवीन प्रकल्प आणावेत.राहुरी फॅक्टरी ते कोपरगाव चौफुली पर्यंतचा रस्ता चौपदरीकरणासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा देखील तालुक्यातील मतदारांनी व्यक्त केली आहे.
विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात करताना पहिल्याच दिवशी श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नावर आवाज उठवून जनतेच्या मनातील आमदार म्हणून हेमंत ओगले यांनी जे पाऊल उचलले त्याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष