By : Polticalface Team ,11-12-2024
                           
              दिनांक 9/12/2024 रोजी बेलवंडी बु॥ येथील रहिवासी असलेले दरवडे कुटुंब यांनी आपल्या नविन वास्तुचा वास्तुप्रवेश आणि वास्तुपुजनाचा कार्यक्रम हा सत्यशोधक पध्दतीनुसार करण्यात आला या कार्यक्रमास परिसरातील व नातेवाईक जनसमुदाय भरपुर प्रमाणात उपस्थित होता
वास्तुचा वास्तुप्रवेश करत असताना पुर्वीची वास्तु आणि आज तयार करण्यात आलेली वास्तु या मधील अंतर पाहता त्या कुटुंबासाठी पृथ्वी आणि आकाश या प्रमाणे फरक पडलेला असतो जुन्या घरातुन नविन घरात येण्याचा आनंद तो उत्सव एक त्या कुटुंबास आगळावेगळाच अंतकरणात असतो
दरवडे कुटुंबाचा आदर्श घेण्यासारखा त्यांनी केलेला हा घटनात्मक संघर्ष
*खरोखरच संघर्ष काय असतो तो कश्याप्रकारे केल्या जातो त्यांनी सांगितल्यावर खरोखरच हा संघर्ष चिंतन करण्यास आपणास भाग पाडत आहे*
नाजुक परिस्थितीतुन हे कुटुंब आज जसे काटेरी पायवाटेवरून खडीच्या वाटेवर त्या वाटेवरून डांबरीकरण झालेल्या वाटेवर पोहचले म्हणजेच आपली असलेली पहिली आर्थिक दुर्बल परिस्थिती बदलून एक भक्कम अशा स्थितीत पोहचलेले हे कुटुंब दिसत आहे हेच यांच्या सहवासात आल्यानंतर पाहावयास मिळाले
आदरणीय नाथा शिवराम दरवडे त्यांच्या पत्नी सुलोचना नाथा दरवडे दोघे ही शेतकरी कुटुंबातील अगदी साधी पती पत्नीची जोडी यांच्या पोटी दोनच मुले जन्मास आली मोठा अशोक तर दुसरा संदीप यांना मुलगी झालीच नाही
अशोक हा मुलगा शांत संयमी सर्वागीण विचार करणारा हा मुलगा या दरवडे कुटुंबाचा वयात आल्यानंतर आधारस्तंभ तयार झाला तर संदीप हा मुलगा आपल्या बाल अवस्थेतुन बाहेर पडलाच नाही याचीच चिंता या कुटुंबाला आज ही सतावून सोडत आहे त्यामुळेच त्याचा विवाह होणे हा विषयच येत नाही आज साधारण हा संदीप आपली वयाची 37/38 वर्षे पार करताना दिसत होता
आद नाथा आणि सुलोचनाताई आज आपल्या उतारत्या वयातुन प्रवास करत आहेत तर अशोक हाच एकमेव कुटुंबाचा आधारस्तंभ झाला आहे
अशोक आणि त्याची अर्धांगिनी सुनिता हेच आज या कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी पाहात आहेत असे निदर्शनास आले
या कार्यक्रमास सुनिताची आई उपस्थित होती त्यांच्या बरोबर बातचीत करत असताना त्यांनी असे सांगीतले की ही माझी मोठी मुलगी आहे आणि हिच्या नंतर दोन मुले आहेत आज एक पदवीधर होऊन उद्योजक झालेला आहे तर दुसरा वकिली करून तो होम मिनिस्टर मनोरंजनात्मक , तसेच उत्कृष्ट निवेदक अशी अनेक येतील ती कामे करत आहे
सुनिता ही शालेय इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असतानाच तिच्या वडीलांचे नदीच्या प्रवासात एका तीरावरून दुसर्या तीरावर प्रवाहात पोहत जात असताना नदीच्या पात्राची कल्पना नसल्यामुळे एक ठिकाणावर चक्री भोवरात अडकून त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यामुळे आमचे गदादे कुटूंब हे उघड्यावर पडले होते मला काय करावे कसे करावे हेच त्यावेळी सुचत नव्हते मुलगी तिसरीत तर एक मुलगा पहिलीत दुसरा मुलगा चार वर्षांचा यांचे शिक्षण तसेच उदरनिर्वाह कसा करावा हेच समजत नव्हते आम्ही दोघा उभयतांनी पाहिलेले सर्व स्वप्न एकांदी वावटळ यावी आणि तिने सर्वच विस्कळीत करून जावे असेच होऊन बसले होते सर्वत्र माझे जग मला अंधारमय अश्या वातावरणात घेऊन गेलेले दिसत होते
लहान मुले असल्याने त्यांचे शिक्षण संगोपन करण्यासाठी मी दिवसभर शेतातील मजुरी करून संध्याकाळी गोधडी शिवणकाम करत असे शेतातील काढणीला आलेल्या उभ्या पिकाचा सौदा उकताच घेऊन एकटीनेच ती कामे पुर्ण करुन मिळालेल्या रूपयावरती उदरनिर्वाह करण्याचे काम केले
मुलांची खाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस करून कामे केली कधी नविन साडी घेयाची म्हंटल तर ती नको वाटायची कारण तिला जादा रुपये द्यावे लागतील व त्यामुळे माझी मुले उपाशीच राहतील म्हणून मी एकांद्या बाईची जुनी साडी कमी किंमत देऊन विकत घेऊन तिच्यावरती राहत असे सणवार आला तर कसा साजरा करावा याची काळजीच मला पडत असे की खर्च जादा झालातर मुलांचे कसे होणार त्यामुळेच पती गेल्यानंतर दहा वर्षांत मी सण कधी साजराच केला नाही
सण आला की माझे वडील माझ्या मुलांना त्यांच्या घरी घेऊन जात असत तिकडेच माझी मुले सण साजरा करत असत पण मी परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने मुलांना सणाचा सैपाक गोड करून घालु शकले नाही याची खंत मला परिस्थितीत बदल झाला तरी मला सतावत आहे माझा एकच उद्दिष्ट नेहमी असे माझी मुले व्यवस्थित वळणावर चालावित कधी त्यांनी लबाडी चोरी व्यसनाधीनता करू नये याची शिकवण पण मी देत राहिले असल्याने माझी मुलगी मुले मी दिलेल्या संस्काराचे नक्कीच चीज करतील याची जाणीव खात्री मला आहेच
माझी सर्व मुले पण त्याची जाणीव ठेवून आजतागायत काम करत आहेत याचाच मला फार अभिमान वाटत आहे
सुनिताचे शिक्षण चालु असताना ती आठवी पास झाली आणि एक दिवस अचानक दरवडे कुटुंब तिला पाहावयास आले असताना या कुटुंबाची परिस्थिती नाजुकच परंतु सर्वच जन स्वभावास उत्तम आहेत असे आमच्या निदर्शनास आल्याने आम्ही परिस्थितीचा विचार न करता मुलीच्या पुढील शिक्षणाची पर्वा ही न करता आपली मुलगी पण चलाख आहे ती या घराला नक्कीच दिशा देण्याचे काम करून आजच्या परिस्थितीतुन या कुटुंबाला सुस्थितीत आणल्याशिवाय राहणार नाही
ही मला खात्री होती म्हणुन या कुटुंबा बरोबर आम्ही नातेसंबंध जोडून घेतले आणि मुलीचा विवाह झाला
विवाह झाल्यानंतर आम्ही लग्नात दिलेला दिवाण यांच्या ते राहत असलेल्या त्या घरात दरवाजातून जातच नव्हता तो घराच्या आत ठेवण्यासाठी यांना घराला एक बाजूने खोलून आत दिवाण ठेवावा लागलेला होता अशी परिस्थिती यांची होती तरी आम्ही सर्व बाजु पाहून देखील केवळ स्वभाव गुणधर्म कुटुंबाचे चांगले आहेत एवढेच पाहून घेतलेला त्या वेळेचा निर्णय आज आमच्या जावई आणि मुलीने त्या निर्णयाचे सोने करताना आम्हाला पाहावयास मिळत आहे यामध्येच आम्हाला खुप समाधान वाटत आहे व भेटत पण आहे
*सुनिता आणि अशोक प्रत्येक येणाऱ्या प्रसंगानुसार एक मताने विचार करून योग्य तोच मार्ग निवडून त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करुन आपल्या घरात परिवर्तन घडवून आणण्याचे काम करत असतात*
सुनिता चलाख कर्तुत्ववान असल्याने आपला परिवार पाहुन पुढे तिला महापुरुषांनी केलेल्या कार्याची आवड निर्माण झाली ती झाल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करण्याचे काम तिने घरचे काम पाहुन हे पण काम हाती घेतले त्या कामामुळे आपला परिवार याचे कडे पण स्वताचे दुर्लक्ष होणार नाही याची दखल घेत आज एक मोठा मुलगा इंजिनिअरिंग शिक्षण घेत आहे तर दुसरा अकरावीत सायन्स मध्ये शिक्षण घेत आहे हे सर्व बाजु ती संभाळत आपले काम जोमदार पणे करताना दिसत आहे
हे काम करत असताना तिचे वक्तृत्व व कर्तृत्व वाढत गेले पुढे ती प्रबोधन करू लागली हे सर्व साध्य सफल होण्यासाठी तिला तिच्या पतीची अशोकची साथ ही मोलाची नाहीतर अनमोलाची ठरलेली आहे हे तितकेच सत्य आहे
*अशोकचे शिक्षण हे एस वाय पर्यंत झालेले तर सुनिता ही लग्नात आठवी झालेली तिचे पुढील शिक्षण अशोकने बारावी पर्यंत तिला आपले घर पाहून शिकवले*
सुनिता आपला परिवार पाहून समाज परिवर्तन चळवळीचे काम अगदी तन मनाने करत असल्याने तिच्या त्या वक्तृत्वामुळे श्रीगोंदा तालुका काँग्रेसने तिला महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष पदावरती घेतले त्यामुळे तिच्यावरील जबाबदारी अधिक वाढत गेली असताना अशोक हा अगदी खंबीर पणाने आपल्या पत्नीला साथ देत होता
*पुढे समाज प्रबोधन करण्याची कामे दुर दुरच्या गावातुन सतत येत असल्याने व आपण एक छोटे गावात राहत असल्याने स्वताचे वाहन नसल्यामुळे वेळेवरती जाने येणे अडचणीचे होऊ लागले होते म्हणून या दोघा पती पत्नीने विचार करून निर्णय घेतला आपण एक चार चाकी वाहन घेतले तर ही अडचण आपली नक्कीच दुर होऊन जाईल आणि काही दिवसातच यांनी आपले स्वप्न पुर्ण करत एक चार चाकी वाहन दारात उभे केले*
*अश्या पध्दतीने समाज परिवर्तन चळवळीचे काम आणि तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम आज ही एकांद्या पुरूषाला लाजवेल असेच सुनिता करत आहे*
आपल्या नावाचा सुनिता दरवडे म्हणून तालुक्यात अल्पवयात व अल्पावधीत ठसा उमटवून या महिलेने ठेवलेला दिसत आहे
*कधी जर कोणी या कुटुंबांच्या घराला भेट दिली आणि हे दोघे ज्या ठिकाणावर आपला रहिवास करत आहे तेथुन कसे सर्व घरचे काम, मुलांचे शिक्षण , घरची शेती तसेच समाज परिवर्तन चळवळ , काँग्रेस पक्षाचे काम करत असतील याचे आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही या कुटुंबाला खरोखरच क्रांतीसुर्य क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांचाच वारसा मिळालेला आपणास पाहावयास मिळतो*
फुले कुटुंबांनी त्या परिस्थितीत काम केले ते काम अनमोलच आहे त्याचाच विचार मनात करून सुनिता आणि अशोक या जोडीने अगदी अंतकरणापासुन आपणास जमेल त्या प्रमाणेच फुलेंनी सांगितल्यानुसार काम करताना आपणास पाहावयास मिळत आहे
घरात अशोकची आई आपल्या पुरातन विचार सरणीची ती विचार सरणी मनात धरून त्या काम करू पाहत असताना या जुन्या परंपरेला छेद देत या जोडीने सत्यशोधक पध्दतीनुसार वास्तुप्रवेश व वास्तुपुजन कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमास सत्यशोधक विधीकार भिमराव कोथिंबीरे यांना आमंत्रित करण्यात आले
कार्यक्रमांच्या वेळेस आई सतत आपल्या मस्तकातील पुरातन चाली रितीरिवाजानुसार काम करण्याचे आवाहन विधीकार यांना करत असत त्यास विधीकार यांनी त्यांनाच विचारत असत ते आपण 100% करू पण मला सांगा ते का करायचे यावरती आई कडे काहीच उत्तर नसे त्यानंतर त्यांना सर्व प्रोग्राम हा आपण आता करत आहोत हे असेच का करत आहोत हे विधीकार सविस्तर त्यांना सांगत असे हा कार्यक्रमाचा विधी आपण आपल्या मनाने करत नाही तर *आपणास आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेला हा सत्यशोधक विधी आहे हे कर्मकांड नाही थोडे समजुन घ्या यावरती आई शांत होऊन जाई सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आईला विचारून घेतले कार्यक्रम कसा वाटला तुमच्या मनाप्रमाणे झाला का त्यावरती आई सह उपस्थित असलेल्या आईच्या समान वयस्कर काही महिला बोलु लागल्या आपला असा विधी असतो आम्ही आतापर्यंत कधी पाहिलाच नाही छान विधी झाला त्या महिला बोलत होत्या आणि आम्हाला त्याचे मनोमन समाधान वाटत होते आणि अंतकरणातुन एकच शब्दाचा जयघोष चालु होता जय सत्यशोधक*
विधीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर काहींचे मनोगत घेण्यात आले असता जास्त प्रमाणात विचार हे महिलांनीच व्यक्त केले
आलेल्या महिलांना या ठिकाणावर *नवरात्रोत्सव: उत्सव नवनिर्मितीचा* हे पुस्तक भेट देण्यात आले
सोबत संविधान प्रचारक आयु रावसाहेब घोडके विधीकार भिमराव कोथिंबीरे आयु रेवन घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त करुन दरवडे कुटुंबास शुभेच्छा देण्याचे काम केले
लेखन
आयुष्यमान रेवन घोडके
9822203602 / 8421879892
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष