By : Polticalface Team ,12-12-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)आहिल्या नगर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विध्यमाने दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार श्रीगांदा तालुक्यातून संत ज्ञानेश्वर विद्यालय ढवळगांव चे मुख्याध्यापकश्री सुपेकर मधुकर रावसाहेब यांना राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर साहेब व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आला शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रात कार्य करत आसताना मधुकर सुपेकर यांनी जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वादाने तसेच कै मछिद्र डोंगरे यांची प्रेरणा जिद्द चिकाटी मेहनत शिस्त अंगिकारुन संत ज्ञानेश्वर विद्यालय मधे कार्य केले आहे विशेष करून ढवळगांव परिसरातील भटकेविमुक समाजातील मुलांना विटभट्टी कामगार मुले मुली साखर कारखाना परीसरात उसतोड मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले विज्ञान तंत्रज्ञान मधे सर्वांगीण विकास साधत - आसताना इस्पायर ऑवॉर्ड मधे शाळा राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे कार्य केले आहे अनेक वेळा १०वी १२वी निकाऊ १००% लागले आहेत व केंद्रात विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकावून गुणवत्ता टिकवण्यासाठी कार्य केले आहे तसेच शैक्षणिक सहल आयोजित केलेल्या आहेत विविध उपक्रम राबविले जातात आजदेखील विद्यालयात ७०% मुलींचे प्रमाण आहे आशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात यावेळी राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर साहेब . माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस प्राथमिक शिक्षण विभाग बी जी पाटील . नियोजन विभाग अहिल्यानगर बाळासाहेब बुगे . वेतन अधिक्षक रामदास म्हस्के साहेब मुख्याध्यक संघ अधक्ष प्राचार्य सुनील पंडीत माजी शिक्षणाधिकारी आरुण धामणे कृष्णकांत चौधरी तसेच मुख्याधापक संघ सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी व मुख्याध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
वाचक क्रमांक :